खंडविकास अधिकाºयांना ग्रा.पं. कर्मचाºयांनी दिले निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना २५५८ तालुका तुमसरचे वतीने १८, १९ व २० डिसेंबरच्या काम बंद आंदोलनाची हाक तसेच राज्य , जिल्हा व तालुका स्तरीय विविध मागण्यांचे निवेदन १९ डिसेंबर रोजी पंचायत समिती तुमसरचे प्रभारी खंडविकास अधिकारी श्रीकृष्ण घटारे यांना देण्यात आले. त्यावेळी उपसभापती हिरालाल नागपुरे हे सुद्धा उपस्थित होते. निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना आपण आपल्या मार्फत पाठविण्याची विनंती सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी तुमसर तालुका अध्यक्ष जयप्रकाश डोंबळे, तालुका उपाध्यक्ष संतोष पंचबुद्धे,सचिव रोशन मरस्कोले,प्रसिद्धी प्रमुख शैलेश चंद्रिकापुरे, इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष यांनी केलेल्या मागणी प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाºयांनी शाळेत तीन दिवस साफ सफाईची कामे करावित हे ९ नोव्हेंबर रोजी काढलेले वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावे ,ग्रामपंचायत कर्मचाºयांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाºया प्रमाणे वेतन देण्यात यावे, भविष निर्वाह निधीची रक्कम ईपीएफ खात्यात वर्ग करण्यात यावे, कर्मचाºयांना उपदान लागू करण्यात यावे, किमान वेतनासाठी लावण्यात आलेली वसुलीची अट रद्द करण्यात यावी आॅगस्ट २०२० ते २०२२ पर्यंतचे थकीत वेतन अदा करण्यात यावे.

जिल्हा व पंचायत समिती स्तरावर असलेल्या मागणीमध्ये कर्मचारी पद भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्धी करुन करावी, मृत कर्मचाºयांच्या वारसानास नोकरी देण्यात यावी, रोजंदारी कर्मचाºयांना कायम करून शासन निर्देशीत वेतन देण्यात यावे, वेतनातून कपात झालेली भविष्य निर्वाह निधी व राहणीमान भक्ता न देणाºया ग्रामपंचायत विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी, शासनाचा हिस्सा व ग्रामपंचायतचा हिस्सा संयुक्तरीत्या देण्यात यावा, १००%, ७५%, ५०% ची तूट भरून काढावी, सेवामुक्त झालेल्या कर्मचाºयांची थकबाकी त्वरित देण्यात यावी, कर्मचाºयांसाठी अनुदान प्राप्त होत नसेल अश्या ग्रामपंचायतीने शासनाकडे मागणी करावी, महिला सरपंचाच्या पतीने व सदस्यांनी कर्मचाºयावर अधिकार गाजवु नये, अशा इतर मागण्यांचा समावेश आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *