भरधाव कार पलटली, तीन जण जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- शहरातील उड्डाण पुलाखाली भंडारा कडून साकोलीकडे जाणारी भरधाव कार महामार्गाच्या कडेला असलेल्या डीवायडर वर चढून पलटी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.१५ वाजताच्या दरम्यान घडली. यात १ गंभीर जखमी जखमी झाले असून उर्वरित २ किरकोळ जखमी झाले आहेत. अमृत किसन दिवाळे (५०) रा. आमगाव जि. गोंदिया असे गंभीर जखमी चे नाव आहे. तर अनुज अग्रवाल (३०) रा. आमगाव जि. गोंदिया व भारत ब्रिजलाल गायधने रा. आमगाव अशी किरकोळ जखमीची नावे आहेत. अनुज अग्रवाल हे भारत गायधने व अमृत दिवाळे यांच्यासह टाटा टियागो कार (क्र. एम एच ३५ एजी ३४०४) ने भंडारा कडून साकोली कडे भरधाव वेगाने जात होते. उड्डाण पुलाचा पिल्लर क्र ५१ व ५२ च्या दरम्यान असलेल्या डीवायडर वर चढल्याने अनियंत्रित झाल्याने पलटी झाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. . घटनेची माहिती होताच लाखनी पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे, गडेगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये फसलेल्या जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले.

अमृत दिवाळे यांच्या खांद्याला व उजव्या डोळ्याच्या वर दुखापत झाल्याने प्रथमोपचार करून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. लाखनी पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चीलांगे यांच्या तक्रारीवरून कार चालक अनुज अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक राजेश बांते तपास करीत आहेत..

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *