गोबरवाही पोलीसांकडुन ११ जनावरांची सुटका

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी : गोबरवाही पोलीसांनी ग्राम खंदाड परिसरात कारवाई करीत ११ जनावरांची सुटका केली. १८ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान गोबरवाही – सिहोरा मार्गावरील खंदाड परिसरात गोबरवाही पोलिसांनी मोठी कारवाई करित कत्तलखान्यात घेवुन जाणाºया पीकअप वाहनावर कारवाई करीत ११ जनावरांची (बैल) सुटका केली.तसेच वाहन चालक व इतर दोन आरोपींवर प्राणी क्रूरता कायद्यान्वये कारवाई करून वाहन जप्त करण्यात आले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी,तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही ठाणेदार विनोद गिरी, पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभारे व अन्य पोलीस कर्मचारी यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.