खदानीतील मातीचा ढिगारा कोसळल्याने बाप-लेकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपुर : खदान परिसरातील खड्ड्यात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा राखेचा ढिगारा कोसळून दबल्याने मृत्यू झाला. ही घटना नंदोरी येथील गिट्टी खदान परिसरात मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. रामचरण जंगेल (५१) व योगेश जंगेल (२७) असे मृतक बाप-लेकाचे नाव आहे. बुधवार, २० डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मुलाचा मृतदेह हाती लागला, तर बापाचा मृतदेहाचा शोधण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. वरोºयापासून ९ किलोमीटर अंतरावर असलेल्या नंदोरी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या गिट्टीच्या खदानी आहेत. गेल्या कित्येक वषार्पासून या परिसरात शेकडो फूट खोल खड्डे खोदून गौणखनिजाचे उत्खनन केल्या जाते. औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेल्या राखीतून हे खड्डे बुजवण्याचे काम गेल्या कित्येक वषार्पासून या परिसरात सुरू आहे. दरम्यान, या परिसरातील क्रशरवर काम करणारे रामचरण झंगेल हे आपला मुलगा योगेश याच्यासह मंगळवारला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मासेमारीसाठी या खड्डयाच्या ठिकाणी गेले होते.

खड्याच्या काठावर उभे असताना अचानक राखेचा ढिगारा कोसळला. त्याखाली दबल्याने दोघांचाही मृत्यू झाला. घटना घडताच सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन याबाबत माहिती दिली. परिसरातील लोकांनी आरडाओरडा करीत या खदानीजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे ठिकाण निर्जनस्थळी असून, मदत न मिळाल्याने दोघांचाही दुदैर्वी अंत झाला. घटनेची माहिती कळताच वरोडा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून शोध घेत होते. परंतु, मंगळवारी रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. बुधवारी चंद्रपूर पोलिसांची ह्यरेस्क्यू टीमह्ण सकाळपासून बाप- लेकाचा शोध घेत आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास मुलगा योगेशचा मृतदेह सापडला, तर बापाचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास वरोडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *