विधानभवनाच्या पायºयांवर डॉ.आंबेडकर रुग्णालयाकरिता माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आंदोलन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : इंदोरा, कामठी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राचे तात्काळ भूमिपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी घेऊन आज राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनाच्या पायºयांवर हातात पोस्टर घेऊन आंदोलन केले. सदर प्रकल्पाच्या विषयावर लक्षवेधी न लागल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी माज्यावर आणि मतदारसंघातील जनतेवर अन्याय केल्याचा आरोप यावेळी डॉ.राऊत यांनी केले.यावेळी माध्यमांशी बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत की मागील २५ दिवसा पासून रुग्णालयाच्या तात्काळ भूमीपूजन करुन बांधकाम करण्याची मागणी करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय बचाव कृती समिती द्वारे बेमुदत जनआंदोलन सदर रुग्णालया समोर सुरु आहे. मात्र राज्य सरकार कृती समितीच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र करिता १३ आॅक्टोबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार एकूण रु.११६५.६५ कोटीच्या प्रस्तावाला आर्किटेक संदीप शिर्के यांनी सादर केलेल्या आराखड्यासहित मंजुरी मिळालेली होती. परंतु भाजपप्रणित शिंदे सरकारने सदर प्रकल्पा करिता रु.५७५.७९ कोटीच्या निधीस मंजुरी देवून दिशाभूल केली असून नागरिकांच्या भावनांशी खेळ केल्याचा आरोप यावेळी डॉ. राऊत यांनी केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *