गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त मअंनिसतर्फे जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर जादूटोणा विरोधी कायदा २०१३ च्या चित्र प्रदर्शनी लावून प्रसार व प्रसार करण्यात आला. त्यापूर्वी राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला डॉ. प्रवीण थुलकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्य वाह विष्णुदास लोणारे यांनी सांगितले की जादूटोणा विरोधी कायदा हा २० डिसेंबर २०१३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात मंजूर झाला असून आज या कायद्याला दहा वर्ष पूर्ण झाले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात १२००/ पेक्षा अधिक जास्त गुन्हे दाखल असून भंडारा जिल्ह्यात या कायद्याअंतर्गत ६८ गुन्हे दाखल आहेत या कायद्याच्या प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठी शासन स्तरावर समिती असून योग्य प्रकारे प्रचार व प्रसार होत नाही त्यामुळे जादूटोण्याच्या संशयावर आजही मोठ्या घटना घडत आहेत.

राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवून गाडगे बाबांचे विचार पुढे पुढे चालत राहावे हा दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य गेल्या तीस वर्षांपासून समाजात करीत आहे . यावेळी चंद्रशेखर भिवगडे, नितेश बोरकर, अखतरबेग मिर्झा,वेंकटराव गायधने , पुरुषोत्तम गायधने, विलास सुदामे,कविता लोणारे ,डॉ. विश्वजीत थुलकर, प्रा. नरेश आंबीलकर प्रा. युवराज खोब्रागडे सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व गाडगेबाबा वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते आहेत हे कोणीही नाकारू शकत नाही असे सर्वांनी आपले मत व्यक्त करून राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगेबाबा यांना अभिवादन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *