गोशाळेत साजरा केला बसुबारस सोहळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील गराडा बूज. येथील विनाताई बडगे गोरक्षण मधे वसुबारस सण गोशाळेतील गाईंचे पूजन करून साजरा करण्यात आला. हिंदू संस्कृती परंपरेनुसार बसुबरास सनापासून दिवाळी सणाची सुरुवात होते. ह्या दिवशी गाय व वासराचे पुजन करुन गोमातेचे आशीर्वाद घेतले जाते. याप्रसंगी गोशाळा संचालक समर्थ बडगे, सहकारी प्रशांत बालपांडे यांच्या हस्ते गोमातेचे पूजन, गो ग्रास भरवून बसुबारस सन साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील गोप्रेमी, गोपालक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *