घरटॅक्स कमी करण्यासाठी मोहाडी नगर पंचायतवर धडकला जनआक्रोश मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी: नगर विकास संघर्ष समितीच्या पुढाकाराने गुरुवार दि.९ नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.५२ वाजता जनआक्रोश मोचार्ला विदर्भ आंदोलन समिती, व्यापारी संघटना, बीआरएस पक्ष ,शिवसेना,राष्ट्रवादी कांग्रेस ने दिलेला पाठींबा व मोहाडी शहरांतील नागरिकांनी तहसील कार्यालय समोर हजारो नागरिक उपस्थित झाले होते.जनतेमधे एवढा आक्रोश पहिल्यांदाच बघायला मिळाला. मोहाडी तहसील कार्यालयातून डफळी व पिपारी वाजवत मोर्चाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत गांधीचौकात सभेत रूपांतर करण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करत सभेला सुरुवात करण्यात आली.सभेमध्ये माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे,सुनिल गिरीपुंजे, सुभाष गायधने, खुशाल कोसरे,रफिक सैय्यद, पुरूषोत्तम पातरे,सेवक चिधालोरे, शोभा बुरडे यांची घर टॅक्स वाढी बाबत नगरपंचायत वर प्रहार करण्यात आले. जनतेच्या हितासाठी नगरसेवक, नगरसेविका मोर्च्यात उपस्थीत होते.त्यांचे अभिंनदन करण्यात आले.

जे नगरसेवक,नगरसेविका उपस्थीत नव्हते.त्याचा विषयी नाराजी व्यक्त करून त्यांनी एक प्रकारे घर टॅक्स वाढीचे समर्थनच केल्याचे समजते असे भाषणातून वक्त्यांनी व्यक्त केले. घर टॅक्स कमी झालाच पाहिजे अशी मागणी जोर धरत असताना सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. त्यांनीं घर टॅक्स कमी करण्याकरता आपले मनोगत व्यक्त केले व हजारो संख्येत नागरीक नगरपंचायत वर निवेदन देण्याकरिता नगर पंचायत वर जात असताना, पोलिसांनी सर्वांना गेट वर थांबविण्यात आले, पण जनता थांबण्यास तयार नव्हते.त्यांना समजावून शिष्टमंडळ मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्याशी माजी आमदार चरण वाघमारे,सुनिल गिरीपुंजे, सुभाष गायधने,खुशाल कोसरे, डॉ.शांताराम चापले,रफिक सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे,अनिल न्यायखोर, सेवक चिंधालोरे,,ग्यानेंद्र आगाशे, बाभरे,मनोहर हेडाऊ, आदर्श बडवाईक यांनी चर्चा करून सर्व नगरसेकांची विशेष बैठक बोलावून बहुमताने ठराव घर टॅक्स कमी करण्याकरीता मंजूर करून जिल्हाधिकारी योगेश कुभेजकर यांचाकडे पाठवावे जर जिल्हाधिकारी यांनी नामंजूर केल्यास अपील करण्यात यावी असा कायदा सुध्दा आहे जेणे करून मोहाडी नगरवासीयावर एवढा घर टॅक्स भूडद बसणारं नाही असे ठरविण्यात आले.

मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम व नगराध्यक्ष छाया डेकाटे यांनी मोर्चाला समोर जात सध्या घर टॅक्स स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले व लवकरच विशेष बैठक घेऊन बहुमतांनी ठराव करून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर पाठविण्याचे सर्व जनतेला आश्वासन दीले.तेव्हा कुठे नागरिकांनी संयमाची भूमिका घेत जल्लोष केला.पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये म्हणून तगडा बंदोबस्त लावलेला होता.पण मोर्चेकरांच्या मागण्या शांततेत पुर्ण झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही हे विशेष. हजारो लोकांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये खुशाल कोसरे,सुनिल गिरीपुंजे, सुभाष गायधने,रफिक सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर, सेवक चिंधालोरे,ज्ञानेंद्र आगाशे,नारायण निखारे यांचा प्रमुख नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी राजेश निंबार्ते,निखिल खोब्रागडे, अक्षय हटवार,भूषण गभने, नरेश पोटफोडे,गणेश निमजे,शैलेश गभने, नगरसेवक, लाला तरारे,मनिषा गायधने,रेखा हेडाऊ,मंदा गणेश मेहर, आदर्श बडवाईक,भीम बारई,राधेश्याम गाढवे,नईम कुरेशी,बाळू बारई,उमा बारई,महादेव भिवगडे,उमराव बोरकर, ब्रम्हानंद आस्वले,रियाज हनफी,रवी थोटे, जिब्राईल शेख,सोनू इलमकर , प्रकाश मारबते,गणेश पात्रे,शालिक खोब्रागडे,गंगाधर पराते,नत्थू नीमजे, श्याम डेकाटे,थामदेव निमजे,नारायण रंभाड, काशीनाथ रंभाड,नितीन निंबार्त, हंसराज निमजे गुरुदास येळणे, अनिल टीचकुले,सिंधू सोनकुसरे, रोशन खळोदे,ज्ञानदेव बोकडे,प्रभू कुंभारे,चंद्रशेखर पातरे, हनेश महालगावे, जयदेव बोकडे,शंकर मेहर, विनोद नंदनवार,बाळकृष्ण समरित आदी उपस्थीत होते. सुरक्षेच्या दृष्टीने मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सदर मोर्च्याच्या समारोप दुपारी तीन वाजता करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *