समर्पण, श्रम संयम व एकाग्रता हेच विज्ञान मुल्यशिक्षणाचे खरे रहस्य – डॉ. विजय मेंढूळकर

भंडारा पत्रिका /प्रतिनिधी साकोली : स्थानिक मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्र मंडळाच्या वतीने नुकतेच विज्ञान व्याख्यानमाला व विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. जे. खूणे हे होते. तर प्रमुख पाहुणे शासकीय विज्ञान संस्था मुंबईचे तसेच डॉ. होमी जे. भाभा विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. विजय मेंढूळकर हे होते.

तर विशेष अतिथी म्हणून विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौदयोगिकी संस्थेतील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनुपमा कुमार हया होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणातून रसायनशास्त्र मंडळाचे संयोजक व विभागप्रमुख डॉ. एल. पी. नागपूरकर यांनी रसायनशास्त्राचे महत्व प्रगतीशिल वाटचाल व वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित विविध उपक्रमांचा आढावा सांगीतला व डॉ. कल्याणी कामडेयांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्य अतिथी म्हणून संबोधित करतांना डॉ. विजय मेंढूळकर यांनी शिक्षणाचे वैश्विकरण, नव्याने येणान्या राष्ट्रीय शिक्षा नितीचे फायदे व विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हाने व आपली योग्यता सिद्ध करण्याची सुवर्णसंधी याबाबत मार्गदर्शन केले व विशेषरूपाने स्पष्ट केले की रसायनशास्त्राचे व आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन अशक्य आहे म्हणून सर्वोपरी ज्ञानसंपन्न, तंत्रसंपन्न होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या विशेष आमंत्रित अतिथी डॉ. अनुपमा कुमार यांनी आपल्या संबोधनातून विद्यार्थ्यांना सांगीतले की, भविष्याची आव्हाने मोठी जरी असली तरी शिक्षण व विज्ञानाच्या संशोधनात आपले समर्पण, वेळेचे परिपूर्ण नियोजन व ज्ञानलालसा जोपासणे गरजेचे आहे.

म्हणूनच संशोधन जोपर्यंत समाजकल्याणासाठी होणार नाही तोपर्यंत खच्याअर्थान राष्ट्राची नवनिर्मिती होणार नाही, म्हणूनच आत्मविश्वासपूर्वक प्रत्येक आव्हानाला सामोरे जावे असे आग्रहाने सांगीतले. तसेच ‘मिलेट्स’ या प्रकारातील नवधान्याची मानवी आरोग्यातमहत्वाची भूमिका व पर्यावरण सुरक्षा यावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे अतिशय महत्वाची माहिती दिली. रसायनशास्त्र मंडळाच्या वतीने आयोजीत सेमीनार, प्रश्नमंजूषा व चित्रकला पोस्टर पेंटींग स्पर्धेचे २० पारीतोषिके, स्पर्धेचे ७६ व पोस्टर मेकींग स्पर्धेचे ७ बक्षिसे प्रदान करण्यात आली व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुध्दा बक्षिसे प्रदान करण्यात आली. त्यात कु. शितल गायकवाड, कु. कंचन अतकरी, नितेश निंबार्ते, पुनम बांते, कु. कोमल टेंभूरकर, रूनाल कडुकर, कु. जानव्ही शहारे, कु. नयन दुरुगकर, कु. श्रृंगली टेंभूरकर, कु. सोनल माहूरे, कु. भेंडारकर, कु. हर्षा मरसकोल्हे, कु. रेशमा वडतकर, साहिली गडपायले इत्यादी विद्यार्थीनींना अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कु. काजल टंडन व आभारप्रदर्शन कु. मिनल टेंभूरकर हयांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयीन प्राध्यापक अधिक संख्येने व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *