आज सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी होणार विवाहबद्ध

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील सुप्रसिद्ध जागृत माता चोंडेश्वरी देवीच्या मंदिरापासून पश्चिम दिशेला ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या हरदोली(झं) येथे संयोजक सरपंच सदाशिव शिवाजी ढेंगे व आयोजक सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती व समस्त ग्रामवासीयांच्या वतीने गुरुवार दि. २० एप्रिल २०२३ ला सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी घटी मुहूर्तावर लाभान तांडा स्टेडियम आंधळगावरोड बाजार चौक हरदोली येथे सात जोडपी विवाहबद्ध होत आहेत. गुरुवार दि.२० एप्रिल २०२३ ला सकाळी ७ वाजता जानवसा स्थळ दुर्गामाता देवस्थान हरदोली येथे वधु-वरांचे आगमन, सकाळी ७.३० ते ८ वाजता वधु वरास वस्तु, आभुषण देवान घेवाण महिला समितीचे सीमा ढेंगे, अल्का झंझाड, सुभदा झंझाड, निता झंझाड, कुसुम झंझाड, ज्योती झंझाड, संगिता झंझाड, गीता राघोर्ते, तेजस्विनी गायधने, ममता झंझाड, विजया सार्वे, सिमा बांते, आशा कुर्वेकर, चांगोना झंझाड, रेखा झंझाड, प्रिती झंझाड, मंजुषा झंझाड,मयुरी तूपट रघुते, नलू माटे, आशा ईलमे, भुमिता झंझाड, वैशाली गायधने, चैताली झंझाड, शालू निंबार्ते, वैशाली गायधने, चंद्रकला निंबाते, सिंधु गायधने, रुपाली झंझाड, लक्ष्मी बुरडे, सुमन झंझाड, लता झंझाड, सुषमा झंझाड, देवला भोयर, शालू ढेंगे, शुभांगी ईश्वरकर, मुक्ता डोळस हे करतील. सकाळी ८.३० वाजता नवरदेवाचे जानवसा स्थळावरून प्रस्थान मिरवणूक, सकाळी ९ ते ९.५० वाजता लग्नमंडपी नवरदेवाचे व अतिथीचे स्वागत वर-वधूचे स्वागत सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष सदाशिव ढेंगे, उपाध्यक्ष गजानन ईलमे, सचिव पंढरीनाथ झंझाड, सहसचिव मनोज अंबादास, कोषाध्यक्ष मोरेश्वर पांडुरंग झंझाड, सहकोषाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर मोहन माटे, मार्गदर्शक डॉ.गौरीशंकर झंझाड, अशोक डोंगरे, शोभाराम बुरडे, विलास झंझाड, राजू बुरडे, विनोद जगनाडे, माणिक शेंडे, जयेंद्र झंझाड, रामा झंझाड, बंडू झंझाड, ग्यानीराम झंझाड, रमेश बांते, गोकुळ गायधने, विनायक गायधने, नवनाथ गायधने, रामरतन झंझाड, राजू कुर्वेकर, संजय रामलाल झंजाड ,मारुती गायधने, प्रकाश बांते,धनराज बांते, काशिनाथ शिंदे हे करतील. सकाळी ९.५० ते ९.५५ मंचावर वर-वधुचे स्थानापन्न, सकाळी ९.५५ ते १० वाजता सरपंच महासेवा संघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, सामूहिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल बावनकर तुमसर, नरेश डहारे गणेशपुर, नाना कांबळे परसवाडा, सदानंद इलमे भंडारा, सूर्यकांत सेलोकर तुमसर, संजय केवट भंडारा, देवदास बोंदरे देव्हाडा मान्यवरांच्या शुभहस्तेदिपप्रज्वलन, सकाळी १० ते १०.१० वाजता कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सदाशिव ढेंगे, सकाळी १०.२० ते १०.३० वाजता चि. अजय शिवराम शेंडे रा. वासेरा संग चि.सौ.कां.पायल बंडू झंझाड रा. हरदोली(झं.), चि.रामभाऊ धरमदास पचघरे रा. खडकी संग चि.सौ.कां.लक्ष्मी मुरलीधर झंझाड पिंपळगांव(झं), चि.नितीन निलकंठ राखडे दहेगाव संग चि.सौ.कां.पुजा राजु घरजारे वडेगाव, चि.सचिन राजेंद्र बुराडे आंधळगांव संग चि.सौ.कां.पुजा अरुण वनवे पांजरा, चि.विजय वसंता बोरकर खमारी(बुट्टी) संग चि.सौ.कां.बाली बळीराम चौधरी धर्मापुरी, चि.विरेंद्र रुपचंद गजभिये वरठी संग चि.सौ.कां.प्रिती बळीराम बोरकर सकरला, चि.अरविंद धनराज आगाशे वरठी संग चि.सौ.कां.प्रगती पन्नालाल पंचे मुंडीपार या वधु-वराच्या पालकांचे परीचय, सकाळी ११.१० ते ११.४० वाजता मंगलाष्टके ह.भ.प.पांडुरंग शेंडे महाराज अळेगाव, सुलग्न, आशिष, मान्यताप्रदान व स्व.सौ लता रामभाऊ धांडे माजी सरपंच नरसाळा यांच्या स्मृतीत सर्व वधू-वरास मंगेश धांडे नागपूर यांच्याकडून पाच भांडे सप्रेम भेट देण्यात येईल, दुपारी१२ ते १२.३० वाजता सत्कार, स्वागत व मनोगत दुपारी २ ते ३ वाजता समारोप, दिवा, वरात, प्रसिद्धी प्रमुख राजू बांते भंडारा, सिराज शेख मोहाडी, विश्वकांत भुजाडे वरठी, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, चंद्रशेखर साठवणे मोहाडी, सुनील मेश्राम रोहणा, नरेंद्र निमकर, गिरीधर मोटघरे मोहाडी, युवराज गोमासे पालोरा, नितीन लिल्हारे सालई खुर्द, नईम कुरेशी, अफरोज पठाण संजय मते आंधळगाव, खुशाल कोसरे, तेजस मोहतुरे मोहाडी यांची उपस्थितीत खुशी इलेक्ट्रिकल्स नागपूर येथील छगन बिल्लोरे यांच्याकडून बुंदीचे गोड जेवण ब्रम्हभोज सकाळी ९ ते आगमनापर्यंत स्थळ इंदुताई मेमोरियल हायस्कुलच्या आवारात हरदोली (झं) येथे होईल. आरोग्य समितीचे डॉ.हिमांशू मते,डॉ.पेंदाम,डॉ.आस्था मदनकर, डॉ.नारायण झंझाड, डॉ.गौरीशंकर झंझाड, डॉ.ज्ञानेश्वर माटे, आशा सेविका शीला झंझाड, अंजना तांदुळकर हजर राहतील. याप्रसंगी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आदींची उपस्थिती राहील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *