धान घोटाळा प्रकरणी कृषकच्या माजी व्यवस्थापकाला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- पूर्व विदर्भातील धानाच्या पट्ट्यात दरवषीर्तील दोन्ही हंगामात प्रचंड प्रमाणात धानाचे उत्पादन होते. या धानाची आधारभूत केंद्रापासून विक्री केल्यापासून ते मिलिंग करण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे अलीकडच्या काळात दिसून आले. साधारणत: मागील दीड दशकापासून धान घोटाळ्याला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. या घोटाळ्यात सर्वांचेच हात अर्थ कारणाने माखले गेले आहेत. हा घोटाळा सर्रासपणे सुरू होता. परंतु, आता काही वर्षांपूर्वी या विरोधात तक्रारी पुढे आल्याने धान घोटाळा उघडकीस येणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहा राईस मिलचा साडेबारा कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहार प्रकरणात समावेश असल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले होते. आधारभूत खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाला तांदूळ परत दिल्याचे (डिओ) आणि शेतक-यांचे खोटे सातबारा आणि खोटी बिले जोडून अपहार केल्याचे हे प्रकरण आहे.त्यामुळे या सहा राईस मिल संशयाच्या भोवºयात सापडल्या आहेत.तत्कालीन निलंबित जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी २०१८ मध्ये याप्रकरणी सीआयडीकडे तक्रार केली होती. त्यानंतर सीआयडीच्या अधिकाºयांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला होता. थील कृषक सेवा सहकारी संस्थेला २०११-१२ मध्ये आधारभूत धान खरेदी केंद्र मिळाले होते.

या केंद्रावरून जवळपास दीड कोटी रुपयांची अफरातफर झाली होती. भरडाईसाठी जिल्ह्यातील ६ राईस मिलकडे धान दिल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. भरडाईनंतर तांदूळ शासनाकडे परत न करता खोटी बिले जोडून शेतकºयांच्या नावेरकमेची उचल करण्यात आली होती. हा घोटाळा एकूण १२.५० कोटी रुपयांचा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही राईस मिल चालकांनी ८.५० कोटी रुपयाचा धान शासनाकडे जमा केल्याचे तपासात आढळून आले. यात मोहाडी तालुक्यातील सहा राईस मिलचा समावेश आहे. या मिलशी संबंधित असलेले मोहाडी, तुमसर व भंडारा तालुक्यातील अनेक खरेदी केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी २०११ मध्ये कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी अशोक शहारे आणि तुमसर येथील कृषक सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन संचालक आणि माजी अध्यक्ष धनराज चौधरी(मांढळ) यांना सीआयडीच्या अधिका-यांनी अटक केली होती.

त्यांना जामीन सुध्दा मिळाला आहे.याप्रकरणी २०१८ मध्ये झालेल्या तक्रारीनंतर सीआयडीने केलेल्या तपासात तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी अशोक शहारे यांचे रेकॉर्ड जप्त केले. त्यात मोठ्या प्रमाणात खोडतोड आढळून आली. मात्र, चौकशीत याचे स्पष्टीकरण ते देऊ शकले नाही. दरम्यान अशोक शहारे आणि धनराज चौधरी या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती.मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे धनराज चौधरी रुग्णालयात दाखल झालें होते. याच धान घोटाळा गैरव्यवहार प्रकरणी तुमसर कृषक सेवा सहकारी संस्थेचे माजी व्यवस्थापक तथा मेहगाव (ता तुमसर) विद्यमान सरपंच शैलेंद्र फंदी हे दोषी आढळल्याने यांना सि आय डी ने मोठ्या शिताफीने सापळा रचुन त्यांना त्यांच्या घरून अटक केली. तर त्यांची न्यायालयाच्या आदेशानुसारभंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आता कीती दिवस कारागृहात मुक्काम राहणार आहे.हे न्यायालय ठरवणार आहे.आरोपी शैलेंद्र फंदी यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहीती आहे.परंतु अद्याप न्यायालयाने जामीन मंजुर केला नसल्याची माहिती समोर आली आहे .मात्र जिल्हा पणण अधिकारी खर्चे निलंबित झाल्यापासून जिल्हा पणन विभागाची धुरा प्रभारीवरच असल्याने जिल्ह्यातील आणखी पुढे येणारे घोटाळे थंडबस्त्यात असल्याने यावर वरदहस्त कुणाचे.? यावर अर्थपूर्ण दुर्लक्ष तर होत नाही.? अशी चर्चा जनमाणसात होत आहे.

सदर धान घोटाळ्यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या धान घोटाळ्याचा तपास सीआयडी कडे असून येरली, नाकाडोंगरी, आंबागड, वाहनी ,बपेरा या संस्थावर पोलिसात गुन्हे दाखल झाले असून माँ शारदा व संकल्प या दोन संस्थाना कोटार्ने दोन महिन्याची मुदत दिल्याने कार्यवाही थांबली होती आता त्यांचा कालावधी संपला असून पुढील कारवाई करू. अजय बिसने प्रभारी जिल्हा पणन अधिकारी भंडारा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.