रेल्वेत चढताना प्रवाशाचा गेला तोल

तुमसर :रेल्वे स्थानकावरून पॅसेंजर प्रवासी गाडीत चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडल्याने प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना तुमसर रोड रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर घडली. रमेश श्रीवास (५२) सुभाष वॉर्ड तुमसररोड असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वेखाली आले नाही.रमेश श्रीवास हे तुमसररोड स्थानकात वरून भंडारारोड येथे जाण्याकरिता आले होते. दरम्यान सकाळी १०.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर टाटा पॅसेंजर रेल्वे गाडी आली. यावेळी रमेश हे रेल्वेगाडीत चढत असताना प्लॅटफार्म व रेल्वेच्या पायरीवरून त्यांचा पाय घसरला व ते खाली पडले. सुदैवाने ते रेल्वे ट्रॅकखाली न आल्याने थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या उजव्या हाताला व शरीराला गंभीर जखमा झाल्या.
रेल्वे कर्मचाड्ढयांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढले व स्थानिक रेल्वे रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचार करून तुमसर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले. प्रवासा दरम्यान रेल्वे गाडीत चढताना प्रवाशांनी घाई न करता सुरक्षित एकमेकांना सहकार्य करून प्रवास करावा, असे आवाहन तुमसररोड रेल्वे प्रबंधकांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *