साई महाविद्यालय तुमसर येथे महामानवाची जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साई महाविद्यालय तुमसर येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला संस्थेचे संचालक किशोर चौधरी यांनी माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर प्रकाश टाकत बाबासाहेबांच्या विचारांना आत्मसात करून समाजात बंधुत्व व समता जोपासावी, समाजाची निर्मिती करावी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे, अशाप्रकारे त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रबोधन केले. याप्रसंगी प्रमुखांनी उपस्थित प्राचार्य देवेंद्र कुमार रंभाड, प्रा. संदीप चामट, प्रा. ज्योती टेकाम, प्रा बावणे, प्रा .सेलोकर, प्रा.स्तुती मेश्राम, प्रा. प्रीती खोब्रागडे, प्रा.आम्रपाली डोंगरे, प्रा.अंजली, राकेश मालाधरे, गुलशन बुधे इत्यादी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *