शेतक-यांची प्रतीक्षा संपली, अखेर ट्रान्सफॉर्मर लागले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: तालुक्यातील आष्टी, लोभी येथे शेती पंपाचा वीज पुरवठा ओवरलोडमुळे वारंवार खंडित होत असल्याने येथील शेतक-यांची गत १० वर्षांपासून शेतीसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मागणी होती. दरम्यान ही रायुकाँ अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी त्या मागणीचा पाठपुरावा करत ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतले. परंतु तीन महिन्यांपासून महावितरण कंपनीने तिथे केवळ खांब उभे केले होते. मात्र मुंगूसमारे यांनी सातत्याने पाठपुरावा करून अखेर त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मर लागल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील आष्टी व लोभी येथील शेतकºयांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा एकाच ट्रान्सफॉर्मर वरून होत असल्याने अधिक वीज भारामुळे वारंवार ट्रान्सफॉर्मर जळणे, त्याच बरोबर वारंवार वीजपुर- वठा खंडित होणे आदी समस्या ने डोके वर काढले होते. त्यामुळे गत १० वर्षापासून महावितरण कंपनी कडे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी येथील शेतकºयांनी केली होती. दरम्यान आमदार राजू कारेमोरे यांच्या प्रयत्नाने ते ट्रान्सफॉर्मर चार महिन्यापूर्वी मंजूर करण्यात आले.

मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याठिकाणी केवळ पोल उभे करून ठेवले मात्र, अद्यापही ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले नव्हते. परिणामी ऐन उन्हाळ्यात मोठ् या प्रमाणात पिकांचे नुकसानाच्या यातना सोसावे लागत होते. दरम्यान ही बाब शेतकºयांनी रायुकाँ अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांच्याकडे मांडताच आमदार राजू कारेमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणच्या मुख्य अभियंता, उप अभियंता, अभियंता व सर्व अधिकाºयांना याबाबत फोनद्वारे, लेखी निवेदनाद्वारे कळवून रायुकाँ अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा करून अखेर तिथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्याने शेतकºयांची होणारी थट्टा व आर्थिक पिळवणूक थांबविली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.