अर्चना ढेंगे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सम्मानीत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील आंधळगाव येथे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्य महिला सन्मान पुरस्कार सोहळा आंधळगाव येथील ग्राम पंचायत कार्यालयात नुकताच पार पडला.त्यात अर्चना पंकज ढेंगे व कलावती लक्ष्मण पारशिवणीकर यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विस्तार अधिकारी एस. एस. शेंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका संगीता दहेकर, लक्ष्मी लांडगे, शारदा पारधी, रेखा बुधे, आशा नंदनवार, निर्मला बुराडे, वैशाली बावणे, सुनंदा तामसवाडे, रविता बांडेबुचे, करूणा चव्हाण, पुष्पा मार्जिवे, मंगला गायधने इत्यादी उपस्थित होते. अर्चना ढेंगे यांनी गावातील महिला व बाल, युवक- युवती समस्या,शैक्षणीक उपक्रम- शाळेतील मुला मुलींशी संवाद कौसल्य साधने विषयी मार्गदर्शन करणे, विविध शासकीय योजना विषयी माहिती देणे.                             महिलांना स्वयंरोजगाराकरीता प्रोत्साहित करणे. विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन जलसुरक्षाविषयी माहिती देणे, कोरोना (कोव्हिड) संसर्गजन्य आजाराविषयी गावातील महिलांना कोविड लसीचे महत्व सांगुन मार्गदर्शन करणे, बचत गट तयार करणे. महिलांना ग्रामसभा विषयी माहिती देऊन महिलांना ग्राम सभेचे महिलांना स्वावलंबी बनवित आहेत. महत्त्व पटवून सभेला उपस्थितराहण्यास मार्गदर्शन करणे, महिला व मुलींना स्वच्छतेचे महत्व पटवून देणे, अशा सामाजिक केलेल्या योगदाना बद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे, ग्राम पंचायत स्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार स्वरूपात शाल, श्रीफळ देऊन अर्चना पंकज ढेंगे व कलावती लक्ष्मण पारशिवनीकर यांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संगीता दहेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्राम पंचायतचे कर्मचारी हर्षकुमार फुले, घनश्याम कुंभारे, आदी गजभिये, जगदिश कराडे, सदानंद आकरे, संतोष लाहोरीया, ज्योती हेडाऊ इत्यादींनी सहकार्य केले. अर्चना पंकज ढेंगे व कलावती लक्ष्मण पारशिवनीकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सम्मानित झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *