तालुका धान खरेदी संघाची कार्यकारिणी गठीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथे तुमसर तालुका धान खरेदी संघाची नुकतीच सभा अयोजित करण्यात आली. या मध्ये संघाचे अध्यक्ष अनिल टेकाम, उपाध्यक्ष रामदास बडवाईक, सचिव अमित मेश्राम व कोषाध्यक्ष वादुमल राने यांची नेमणूक करुन तुमसर तालुका धान खरेदी संघाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. यावेळी सभेत धान खरेदी केंद्र चालक संस्थांना शासनाने व बाबद चर्चा करण्यात आली त्याच बरोबर गोदाम भाळे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भाडे प्रमाण पत्रानुसार मिळावे, धान खरेदी संस्थांना कमिशन प्रती क्विंटल ५० रू.मिळावी तसेच धानाची घट ३% करण्यात यावी व ईतर मुद्यांकरीता संघाद्वारे कोर्टात दाखल करण्यात येत असलेल्या याचीके संबधीत माहीती देण्यात आली व जो पर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही किंवा धान खरेदी संस्थांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणीही शेतकरी नोंदणी किंवा मार्केटिंग फेडरेशननी लावलेल्या धान खरेदी सुरू करणार नाही अटि मुळे होणा-या नुकसानी असा एकमुखी निर्णय सभेतघेण्यात आला.

यावेळी सभेला जिल्हा सचिव धान खरेदी संघ ठाकचंद मुंगुसमारे, अनील टेकाम, राजु गायधने, रामदास बडवाईक, हरेंद्र रहांगडाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भोयर, अनिल साठवने, योगराज टेंबरे, अमित मेश्राम, निर्वाण बोपचे, ईश्वर गौपाले, अश्विन जगने, रियाज काझी, सुरेश उताने, जय मोरे, शंकर तितीरमारे, अशोक चौधरी, युवराज पारधी, वादुमल राने, जाकीर तुरक, धिरज पंचभाई, ललीत राठोड व सर्व धान खरेदी केंद्र धारक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.