जातीय व्देषातून हत्या करणाºया आरोपींना कठोर शिक्षा द्या!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : बोढार हवेली जि.नांदेड येथे अक्षय भालेराव यांने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गावात मिरवणुक काढली. मात्र त्या मिरवणुकीचा राग मनात धरून विकृत मानसीकतेचा जातीय वादी लोकांनी अत्यंत निर्दयीपणे अक्षयच्या आई व भावा समोरच निर्घृण खुन केला. या अमानवीय व काळीमा फासणाºया घटनेचा वंचीत बहुजन आघाडी तर्फे निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी तुमसर पोलिसांमार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.

निवेदनात अक्षय च्या मारेकºयांना कठोरात कठोर शिक्षा दयावी. तसेच अक्षय भालेराव निर्घुण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, भालेराव कुटूंबीयास पोलिस संरक्षण देण्यात देवून अक्षय भालेराव कुटूंबीयास तातडीने ५० लाखा ची मदत करण्यात यावी. व सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी. आदी मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक तुमसर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देते वेळी वंचित बहुजन महिला आघाडी चे सुनीता टेंभुर्ने, उमाकांत रामटेके, प्रकाश भुतांगे सह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *