समाजाने शेती सोबत शिक्षणालाही महत्त्व द्यावे-मा.खा. शिशुपाल पटले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : क्षत्रिय युवा पोवार समाज संघटना हमारा च्या वतीने वसंत पंचमीनिमीत्त १४ फेब्रुवारीला मौजा हसारा येथे चक्रवर्ती राजाभोज जयंती व पोवार समाज सम्मेलनाचे आयोजन करण्यातआले होते. सम्मेलनाचे उद्घाटन माजी खासदार मा.शिशुपाल पटले यांचे शुभ हस्ते फित कापुन करण्यात आले. सर्वप्रथम देवी गडकालीका माता व राजाभोज यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पं.स.च्या माजी सभापती सौ. पल्लवीताई कटरे होत्या. पोवार समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

समाजाने शेती सोबतच शिक्षणाला महत्त्व द्यावे. आधुनिक काळात शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही. आपला समाज संस्कारित समाज आहे. आपल्या रुढी, परंपरा विज्ञानाला धरुन असल्याचे मत माजी खासदार शिशुपाल पटले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून व्यक्त केले.

कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतीनिमित्त गावात शोभायात्रा काढण्यात आली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री मा.नानीकराम टेंभरे यांचे समात प्रबोधनपर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर राजेंद्र पटले, राजेंद्र कटरे, महीला आघाडी ता.महामंत्री सौ.प्रियंका कटरे, पं.स.सदस्या सौ.सुशिला पटले, मांगलीचे सरपंच पंकज पारधी, माजी सरपंच परमानंद कटरे, माजी सरपंच शिवशंकर शरणागत, बुधराम पटले, माजी सरपंच सौ.रत्नाबाई भगत, प्रमीला कटरे, सुंदरलाल कटरे, उपसरपंच अविनाश पटले, प्रेमकुमार पटले, नितीन शरणागत, चैनलाल पटले, हेमराज कटरे, धनलाल पटले, सुखदेव कटरे, राधेश्याम कटरे, दुर्योधन कटरे, अंकुश कटरे, वसंत कटरे, संजय येळे आदी मान्यवर व्यसपिठावर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन शरणागत कार्तिक कटरे, दिलीप कटरे, कुणाल कटरे, शुभम कटरे, सरोज राणे व संजय तुरकर तसेच व्यवस्थापक समितीच्या सदस्यानी परीश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *