वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणे काळाची गरज- विष्णुदास लोणारे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जि.प.प्राथमिक शाळा मानेगाव (बाजार ) येथे श्रीमती रेवाबेन मनोहर भाई पटेल महिला कला महाविद्यालय भंडाराच्या राष्ट्रिय सेवा योजना शिबिरात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या युवकांचा ध्यास – ग्राम – शहर विकास या संकल्पनेवर मानेगाव बाजार येथे महाविद्यालयस्तरीय रासेयो शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अंधश्रद्धा सामाजिक समस्या या कार्यक्रमांतर्गत शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी सांगितले की समाजात जोपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही तोपर्यंत अंधश्रद्धा राहणारच. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणे काळाची गरज आहे.

प्रत्येक घटनेमागे कारणे असतात ते कारण शोधणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत लोणारे यांनी मांडले. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रयोगात हातावर पेटता कापूर खाणे, लंगर सोडविणे, आपोआप आग लागणे, बिना तेलाचा दिवा पेटवणे असे विविध प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले. जादूटोणा विरोधी कायद्याविषयीची माहिती युवा कार्यकर्ता नितेश बोरकर यांनी दिली. या प्रसंगी प्रा. किशोरदत्त पाखमोडे, डॉ.श्वेता वेगड, सुहास पातोळे, घरडे, वैष्णवी बिलवणे, गायत्री मोकदम, रसिका क्षीरसागर, प्राची देशमुख, सुचिता रक्षमवार, अश्विनी वाघमारे, आरती खोब्रागडे, तनू बावणे, ज्ञानेश्वरी चकोले, सोनाली गोखले, रूपाली मते, वैष्णवी राऊत, प्रियंका मुरकुटे, नंदनी देव्हारे, अनन्या आंबिलढुके, भूमिता खडसिंगे, अश्विनी पडोळे, प्राची देशमुख, पूजा पडोळे, ऋतुजा ठाकरे, सुप्रिया कनोजे, प्रतीक्षा तरारे, दिव्या नागरीकर, खुशबू भोयर, संजीवनी नेवारे, करीना टेकाम, तृप्ती ठाकरे, तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *