आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी स्वीकारले अंगणवाडी कर्मचाºयांचे निवेदन

भंडारा : भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिनांक २९ डिसेंबर २०२३ ला दुपारी २ वाजता अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाच्या मंडपात येऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले व शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तर कॉ. हिवराज उके, सविता लुटे, मंगला गजभिये, अल्का बोरकर, रिता लोखंडे, रेखा टेंभुर्णी, मंगला रंगारी, किसनाबाई भानारकर, कल्पना साठवणे, शोभा बोरकर इत्यादींनी निवेदन सादर केले. ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचारी संपावर असून वेतनश्रेणी, मानधन वाढ, ग्रॅच्युईटी, दरमहा पेन्शन, आजारपणाची रजा इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या त्वरित न सोडविल्यास नाईलाजाने मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरू राहील. या काळात कुपोषण वाढ झाल्यास किंवा अनुचित प्रकार घडल्यास याला शासन जबाबदार राहील याची नोंद शासनाने घ्यावी असे आवाहन संयुक्त कृती समितीच्या वतीने कॉ. दिलीप उटाणे यांनी केले असल्याची माहिती कॉम्रेड हिवराज उके यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *