…तरीही जिल्ह्याची पैसेवारी ८७ पैसे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी, पूर, कीडींचा प्रादूर्भाव, पिक कापणी व मळणीच्या वेळी आलेला अवकाळी पाऊस अशा परिस्थितीतही जिल्हा प्रशासनाने २८ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ८७ पैसे जाहीर केली. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. गोंदिया तालुक्यातील ४ गावे वगळता ९१५ गावांची ५० पैशांच्या वर पैसेवारी गेली आहे. उल्लेखनीय म्हणजे सप्टेंबर महिन्यात जिल्हा प्रशासनाने नजर अंदाज पैसेवारी ९५ पैसे, आॅक्टोबरमध्ये सुधारित पैसेवारी ९३ पैसे काढली होती. पीक पैसेवारी हा शेतकºयांच्या दृष्टीने अंत्यत जिव्हाळ्याचा विषय आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये शासनाकडून शेतकºयांस मिळावयाचे विविध प्रकारचे सहाय्य हे पीक पैसेवारीवरच अवलंबून असते. जर, ५० पैशांच्या आत ही पैसेवारी असली तर दुष्काळ समजला जातो.

गत पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाने झोडपून काढले. त्याचा फटका शेतीला बसला. यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला. त्यामुळे पैसेवारीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पिकांची वाढ, पावसाचे प्रमाण, जमिनीचा प्रकार याची नोंद घेऊन निघालेल्या पिकाचे वजन करून अंदाज बांधला जातो. आलेल्या अंदाज वरून पैसेवारी जाहीर करण्यात येते. त्यानंतर पहिल्यांदा पैसेवारी जाहीर केली जाते. त्यावर आक्षेप मागवले जातात. जर नागरिकांनी यावर आक्षेप घेतला तर ही समिती गावात जाऊन पुन्हा पाहणी करते आणि त्यानंतर अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. जिल्ह्यात ९९५ महसूल गावे आहेत. पैकी ९१९ गावे पिकाखाली तर ३६ गावे पिक नसलेली आहेत. जिल्ह्यातील ९१९ महसूली गावांची अंतिम आणेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली असून, गोंदिया तालुक्यातील मरारटोला, कासा, पुजारीटोला, ब्राह्मणटोला ही गावे वगळून ९१५ गावांमध्ये ५० पैशांच्या वर पैसेवारी गेली आहे.

तालुकानिहाय पैसेवारीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास गोंदिया तालुक्यातील ८२ पैसे, तिरोडा ७४, अर्जुनी मोरगाव व देवरी ९०, आमगाव ८९, सालेकसा ९२ सडक अर्जुनी ८८ व गोरेगाव तालुक्याची सर्वाधिक ९३ पैसे आणेवारी गेली आहे. जिल्ह्यात जुलै, आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ हजार हेक्टरमधील तर अवकाळी पावसामुळे २७ हजार हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यामुळे ४२ हजार शेतकरी प्रभावित झाले. असे असताना जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.