दुकानफोडीतील आरोपीसह अल्पवयीन बालकाला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: तालुक्यातील निलज येथे २९ फेब्रुवारी रोजी मोबाईल दुकान फोडून मोबाईल व रोख असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी एका आरोपीसह अल्पवयीन बालकाला अटक केली आहे. संदिप हरिणखेडे यांचे दुकानाचे शटर तोडून अज्ञात व्यक्तींनी ३ मोबाईल संच व गल्ल्यातील ५२ हजार रोख चोरी केला होता. याप्रकरणी रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नितीन श्रीराम कावरे (१९) व १५ वर्ष ५ महिन्या अल्पवयीन बालक दोन्ही रा. सागरटोली (निलज) यांना अटक केली. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून २०हजाराचे मोबाईल संच जप्त केले. दरम्यान न्यायालयाने आरोपींना ७ मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *