‘गण गण गणात बोते’ च्या गजरात दुमदुमले जवाहरनगर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर : आयुध निर्माणी वसाहत परिसरातील टाईप टु येथील श्री गजानन महाराज मंदिरात संत श्री गजानन महाराजांच्या १४६वा प्रगटदिनोत्सव साजरा करण्यात आला. येथील उत्सवाला एक दिवसां पूवीर्पासून सुरुवात झाली होती. महाअभिषेक, गजानन विजय ग्रंथ पारायण,सत्य नारायण कथा पूजा,होम हवन व आरती, गोपाळ काला व महाप्रसाद सायंकाळी श्री ची पालखी चे उद्घाटन महाप्रबंधक सुनिल सप्रे,वरिष्ठ महाप्रबंधक पी.के. मेश्राम,संयुक्त महाप्रबंधक प्रसाद यांचे उपस्थितीत प्रगटदिनी महाराजांची पालखी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील कलशधारी महिला तसेच परिसरातील भजन मंडळे, दिंड्या आणि भाविकांच्या उपस्थितीत ही पालखी जवाहरनगर वसाहत परिसराचे भ्रमण करून मंदिर परिसरात पोहोचली. भजन मंडळ यांनी भजन सादर केले. संध्याकाळी महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत गजानन महाराज प्रकट दीन उत्सव समिती जवाहरनगर चे गिरीष खुळे, नंदु किरपाने, प्रफुल्ल टाके,संदिप, तिडके, रवि नक्षिने,, अमोल गोमासे, सुरेन तांडे, राजू पटले,, खेराजराम, रवि उरकुडे, राजू सेलोकर, विनोद धोंडगे, सागर महाजन, जय बोरकर, राहुल ढाके, क्रिष्णाकुमार चौरागडे राहुल अंबाडरे ,उमेश टिपले,संगीता चौरागडे, निलिमा टिपले, संगिता खुळे,आरती किरपाणे, संध्या गोमासे,, सौ. वणवे, शीतल अंबाडारे,शीतल टाके,सपना तांडे, किरण धोंडगे,नंदिनी महाजन ,अर्चना उरकुडे,पुनम सेलोकर, योगिता बोरकर इत्यादींनी सहभाग घेतले होते .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *