भंडारा-गोंदिया लोकसभेवर शिवसेनेचा दावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हा शिवसेनेच्या विस्तृत सभेत भंडारा गोंदिया लोकसभा संघ हा शिवसेनेच्या कोट्यात देण्यात यावे असा ठराव घेण्यात आला. आज दि. १८ जून रोजी जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांच्या अध्यक्षतेत रावणवाडी येथील फार्म हाऊसवर घेण्यात आलेल्या सभेत सर्व संमतीने हा ठराव पास करण्यात आला. ताकत उभारल्या गेली आहे. इतकेच नाही तर गोंदिया जिल्ह्यातही शिवसेनेची सांगठणात्मक ताकत दिसून येते. त्या मुळे शिवसेनेचे अनेक उम्मेदवार येथून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्या मुले हा मतदार संघ शिवसेनेकडे देण्यात यावा असा ठराव घेण्यात आला असून लवकरच तो पक्ष श्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे. इतकेच नाही तर भंडारा जिल्ह्यात शिवसेना भाजप शिवसेना(शिंदे गट) या पक्षाचे युती चे नरेंद्र भोंडेकर हे एकमेव भंडारा जिल्ह्यात एक आमदार असून तीनही मतदार संघात शिवसेनेची मोठी आमदार असल्याने त्यांना मंत्री मंडळात स्थान देवून जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात यावे असा ठराव सुद्धा बैठकीत घेण्यात आला.

सोबतच राज्य शासनाच्या आशासकीयसमित्यांची लवकरच घोषणा करून ६०-४० या प्रमाणात जिल्हा व तालुकास्तरावर समित्यांमधे स्थान देण्यात यावे हाही ठराव या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत भंडारा जिल्ह्यातील तुमसर, संकोली, भंडारा, पवनी, या चारही नगर पालिका निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रमुख अनिल गायधने यांनी केले. या बैठकीत सदस्य नोंदणी, गाव तिथे शाखा, बूथ समित्या तयार करणे, जिल्हा कार्यकारिणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात पक्ष संघटन वाढविण्या करीता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत उपजिल्हा प्रमुख सुरेश धूर्वे, उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाए, उपजिल्हा प्रमुख मिलिंद रामटेके, जिल्हा संघटक किशोर चौधरी, डॉ. नरेंद्र पारधी, महिला आघाडी जिल्हा संघटिका सविता तुरकर, आशा गायधने, जॅकी रावलानी, प्रकाश मेश्राम, आदि यावेळी मंचावर उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यातील सतही तालुक्याच्या तयार करणे व पुनरगठीत करणे, आदि शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी उपस्थित व विविध अंगीकृत शाखांचे २०० प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *