जिल्हयातील चार विविध रस्ता बांधकामांना मंजुरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हाच्या सर्वांगीण विकासा साठी कटिबध्द असलेले खासदार प्रफुल पटेल हे समस्यांना वाचा फोडण्यासाठी कधीही मागे पडलेले नाही. जिल्हाच्या विकासात ज्या बाबी अडसर ठरत आहेत त्या समस्यांना मार्गी लावण्यासाठी खासदार प्रफुल पटेल हे सतत प्रयत्नरत राहतात याच श्रृंखलेत दुरावस्त आलेल्या रस्तांचे बांधकाम व नुतनीकरण्याचे कामासाठी राज्य शासनासी पाठपुरावा केला परिणामी त्या पाठ पुराव्याला यश मिळाले असुन चार जिल्हा मार्गाच्या बांधकामाला सार्वजनीक बांधकाम विभागाने मंजुरी प्रदान केली आहे. खासदार प्रफुल पटेल यांना या रस्त्यांचे बांधकाम करणे अत्यावश्यक आहे असे निदर्शनास आणून देण्याचे काम माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. चारही रस्त्याचे बांधकामासाठी १२ कोटी १३ लाख निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे यामुळे लाखनी, मोहाडी, लाखांदूर व भंडारा या तालुक्याचा जनतेनी त्यांचे आभार मानले आहे.

भंडारा जिल्हयाचा सवार्गीण विकासात दुरावस्थतेत आलेले सर्व रस्ते अडसर ठरत असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन व कार्यकर्त्यांनी खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्दशनास आणून दिले, दरम्यान खासदार प्रफुल पटेल यांनी जिल्हा व सार्वजनिक प्रसाशनाला दुरावस्थेत आलेल्या सर्व रस्त्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याचा सुचना केल्या तसेच संबंधीत मंत्री आणि राज्य सरकारशी या संदर्भात पाठपुरावा केला. परिणामी राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा जिल्ह्यातील चार जिल्हा मार्गाच्या कामांना मंजुरी प्रदान केली आहे.

यामध्ये मोहाडी तालुक्यातील नविन ढिवरवाडा/मुंढरी-निलज- देव्हाडा या १४ किमी चा रस्त्सासाठी ४ कोटी ५० लाख, लाखनी तालुक्यातील अड़याळ -पालांदुरदिघोरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ५७ लाख, लाखांदुर तालुक्यातील किटाळी-मासळविरली या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्तीसाठी २ कोटी ५८ लाख व भंडारा तालुक्यातील राष्ट्रीय माहामार्ग क्र ५३ ते कारधा पर्यंतचा रस्ता दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख या रस्त्यांचा समावेश असून एकुण रस्ता बांधकामासाठी १२ कोटी १३ लाख रुपयांची निधी मंजूर केले आहे. यामुळे भंडारा जिल्हयाचा विकासाला गती मिळणार आहे. खासदार प्रफुल पटेल यांचा पाठपुराव्यामुळे दुरावस्थेत आलेल्या रस्त्यांची समस्या मार्गी लागणार असल्याने खा. प्रफुल्ल पटेल व माजी आ राजेंद्र जैन यांचे आभार मानले जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *