अखेर शिक्षण विभागाच्या चमूने केली शाळेची पाहणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च वरीष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे जीर्ण इमारतीच्या छताचे तुकडे आठ दिवसापुर्वी कोसळले होते. यात लहान विद्यार्थी थोडक्यात बचावले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी ही बाब उचलून धरली असता मंगळवार १८जुलैला भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील चमू शाळेत दाखल झाली. त्यांनी संपूर्ण शाळा परीसराची पाहणी करून तातडीने लहान मुलांच्या सुरक्षेसाठी वर्गखोल्या बांधकामासाठी पुढाकार घेतला. सदर इमारतीचे बांधकाम हे सन २००२ ला झाले होते. या इमारतीच्या वरील सॅब ३० ते ३५ मीटर असून तो जीर्ण झाला आहे. सदर जीर्ण इमारतीवरून स्लॅबचे तुकडे कोसळत असून काही वर्गखोल्यांना तडे गेले आहेत. पावसात स्लॅबलाही गळती लागत आहे. १० जुलैला शाळा सुरू असतानाच स्लॅबचे तुकडे कोसळले आणि पटांगणात असलेले विद्यार्थी वर्गखोलीत जात असतांनाच थोडक्यात बचावले.

नविन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी शाळेने अनेकदा पत्र दिले. पण यांकडे दुर्लक्ष केले जात होते. या धोकादायक प्रकाराची स्थानिक प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसिध्द केले. यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील चमू आज अचानक शाळेत दाखल झाली. चमूसह जि. प. सभापती मदन रामटेके, शितल राऊत, साकोली तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक कापगते, शहराध्यक्ष दिलीप मासूरकर, पुष्पा कापगते, दिलीप निनावे, दिपक थानथराटे, विजय साखरे, जयेश राऊत हे हजर होते. त्यांनी संपूर्ण शाळेतील वर्गखोल्यांची पाहणी केली. यानंतर या जीर्ण इमारत विषयी झालेल्या बैठकीत लहान मुलांच्या प्रथम सुरक्षेसाठी सभापतींकडे तत्काळ नविन वर्गखोल्यांचे बांधकामासाठी मागणी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कोवे, सदस्य आशिष चेडगे, रवि भोंगाणे, मुख्याध्यापक डि. डी. वलथरे, सहा. शिक्षक एम. व्ही. बोकडे, आर. आर. बांगरे, टि. आय. पटले, बी. पी. राऊत, शालिनी राऊत, रेवंता बिसेन, कार्तिक साखरे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *