पावसाळी अधिवेशनात १४७ कोटींची भेट!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गेल्या काही काळात आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे भंडारा विधान सभेत विकास कामांकरीता निधी ची मागणी करण्यात आली होती. ज्याला हिवाळी अधिवेशनाच्या पूरक मागणीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सोमवार पासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनातील प्रथम दिवशी अर्थसंकल्पाच्या पूरक मागणीत भंडारा विधानसभे करीत १४७ कोटींच्या विकास कामांकरीता निधीला मंजूरी देण्यात आली आहे. भंडारा विधानसभा क्षेत्राच्या विकास करीता दूरदृष्टि ठेवून आ. नरेंद्र भोंडेकर यांनी शासन दरबारी काही मागण्या केल्या होत्या. त्यात भंडार विधानसभेतील दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात अल होता. या कामापैकी काही कामांना गेल्या काळात प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली होती. सोमवार १७ जुलै पासून मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आणि प्रथम दिवशीच अर्थसंकल्पाच्या पूरक मागणीत भंडारा विधानसभेकरीता १४७ कोटींची भेट मंजूर करण्यात आली.

यात भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल भवन च्या इमारत बांधकामा करीता ५१.४३ कोटी, भंडारा उपविभागीय कार्यालय व तहसीलल कार्यालयाच्या इमारत बांधकाम करीत १४.९४ कोटी रुपये, भंडारा तालुक्यातील २५ तलाठी कार्यालयाच्या बांधकाम करीत ३.७५ कोटी रुपये, भंडारा येथील व्हीव्हीआयपी विश्रामगृह बांधकाम करीत ३.४३ कोटी, पवनी तालुक्यातील विश्राम गृहाचे बांधकामा करिता २.४७ कोटी रुपये, पवनी तालुक्यातील कोंढा येथे अनुसुचित जाती व नाव बौद्ध मुलांचे निवासी शाळे च्या इमारत बांधकामा करिता ३४.६७ कोटी रुपये तसेच भंडारा येथील जिल्हा महिला रुग्णालयाचे इमारत बांधकामचे टप्पा दोन करीत निधीला मंजूरी देण्यात आली असून आ. भोंडेकर यांच्या मागणी वर भंडारा विधानसभेच्या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्ती करीत २५ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. या निधील मंजूरी मिळाल्या नंतर लवकरच वरील कामांना सुरुवात केल्या जाणार आहे. अधिवेशनाच्या प्रथम दिनीच भंडारा विधान सभेला निळलेल्या या निधी करीत आ. नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री , देवेंद्र फडणवीस, अजित पवार व शासनाचे आभार मानले असून, भंडारा विधानसभेच्या विकास करीत निधी खेचून आणल्या बद्दल शिव सेनेच्या पदाधिकाºयांनी आ. नरेंद्र भोंडेकर यांचे अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *