विदर्भस्तरीय बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता सम्मेलन

भंडारा : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांनी वर्षभरापूर्वी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांची आता विदर्भात एन्ट्री होत आहे. येत्या १७ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वा त्यांची सभा सुरेश भट सभागृह, रेशीम बाग, नागपुर येथे होणार आहे येथे ते विदर्भस्तरीय बहुजन समाज पार्टी कार्यकर्ता सम्मेलनला संबोधित करतील. आकाश आनंद यांनी मुंबईच्या सभेतून महाराष्ट्रात एन्ट्री घेतली. पक्षाची जबाबदारी सांभाळल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरला येत आहेत. देशात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या मुद्दयांना बगल देत आहेत.

बेरोजगारी, महंगाई, जातिवाद मुळ मुद्दयांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकार आहे. मणिपूरमधील हिंसाचार, समान नागरी संहिता, देशातील बेरोजगारी, महागाई, धर्माधर्मामध्ये निर्माण झालेली धार्मिक तेढ यावर केंद्र आणि राज्यातील सरकार मुग गिळून गप्प बसले आहे. आता या सरकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम बसपा करणार आहे. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या चळवळीला बळ देण्यासाठी बहुजन समाज पार्टी चे प्रदेश सचिव दिलीप मोटघरे, जय मेश्राम आणि शंकर भेंडारकर, भंडारा जिल्हाध्यक्ष पाम्बीर्द यांनी बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्हा चे सर्व जिल्हा, विधानसभा, सेक्टर, बूथ पदाधिकरी, सर्व कार्यकर्ते हितचिंतकांना आणि सर्वसामान्य जनतेने जास्तीत जास्त संख्येने नागपुरात पोहोचून संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *