गौण खनिज.. रेती.. मुरूम.. गिट्टी शासकीय दराने उपलब्ध करून द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने कंत्राटदारांना बांधकामासाठी लागणारे बिल्डिंग मटेरियल रेती, मुरूम, गिट्टी सध्या निर्धारित केलेल्या शासकीय दरापेक्षा १० ते २० पटीने अधिकची रक्कम देऊन खरेदी करावी लागत आहे. मुरमाची वाहतूक परवानगी मिळत नाही, कंत्राटदारांना शासकीय कामे जसे इमारत व रस्त्याची इत्यादी कामे करण्याकरीता मुरमाची वाहतूक परवानगी तसेच रेतीचे घाट बंद असल्याने रेतीच्या पुरवठा होणे शक्य नाही आणि तसे प्रयत्न केले असता १० ते २० पटीने रक्कम देऊन मुरूम रेती उपलब्ध करावी लागते. शासकीय काम निर्धारित वेळेत होण्यासाठी बिना परवानगी रेती व मुरमाची वाहतूक केली असता लाखो रुपये दंड कंत्राटदारांना शासनाचे काम करण्यासाठी भरावे लागत आहे. रेती घाट व मुरूम खदान प्रत्येक तालुका निहाय शासकीय दराने सामित्वधन आकारून कामाला लागणाºया रेती मुरमाची व्यवस्था शासन स्तरावर करून द्यावी व लागणारे सामित्वधन बांधकाम विभागातर्फे बिलामधून कपात करून घ्यावी ज्यामुळे शासनाला स्वामीत्वधन उपलब्ध होईल व कंत्राटदारांना जे दंड बसतो तो बसणार नाही. मुरूम व रेतीची वाहतूक परवानगी नसल्याने शास्- ाकीय कामे भरपूर प्रमाणात प्रलंबित आहेत त्यांना बिना दंड मुद्दत वाढ देण्यात यावी तसेच बांधकाम विभागातर्फे मिळणाºया सर्व पेमेंट मध्ये १८% जीएसटीची तरतूद करावी ज्या कामाचे अंदाजपत्रक मध्ये १२ टक्के जीएसटी तरतूद आहे त्यामध्ये सहा टक्के वाढ करून तांत्रिक मान्यता नव्याने घ्यावी. तसेच ठेकेदार बंधूचे वर्षापासूनचे पेमेंट मिळाले नाही त्याचे सर्व पेमेंट ताबडतोब देण्यात यावे. तसेच कित्येक कामे वन विभागा च्या हद्दीला लागून असतात वन विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे तेही शासकीय कामे आहे परंतु वन विभाग सदर कामे अडवितात तरी सदर बाबींचे सुद्धा विचार पूर्वक विचार करावा.

भंडारा जिल्ह्यातील रेती जवळ असून रेती आज ५२ रुपये फिट दराने तसेच नागपूर पाचगाव वरून मिळणारी क्रशर ब्रोकन गिट्टी ३१ रुपये फुट दराने मिळते. हे बाब अत्यंत बांधकामासाठी गंभीर बाब आहे तसेच घरकुलाचे बांधकामात या तफावती मुळे कामे खोडमलेली आहेत. तरी माननीय जिल्हाधिकारी साहेब भंडारा यांना निवेदन देण्यात आले की शासकीय स्वामित्वधन आकारून कंत्राटदारांना भंडारा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात रेती, मुरूम, दगड, बांधकामा करता उपलब्ध करून द्यावे. अन्यथा न्यायालयीन मार्गाच्या अवलंब करावा लागेल अशा स्वरूपाचे निवेदन कंत्राटदार असोसिएशन भंडाराच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले व न्याय मिळण्याची अपेक्षा करण्यात आली. निवेदन देतेप्रसंगी भंडारा कंत्राटदार असोसिएशनचे संजूभाऊ एकापुरे, भरत खंडाईत, अभिजीत वंजारी, राजेश कोटेवार, ऋषी भुरे, प्रकाश थानथराटे, निर्मल नागपुरे, रामप्रसाद मिश्रा, शांताराम नागपुरे, भरत रंगारी, हरिभाऊ रूपमोडे, धनराज चौधरी, संतोष गेडाम, मनीष तिरपुडे, मिलिंद मेश्राम, विलास घाटबांदे, राकेश मलेवार, ललित कुमार जांभुळकर, विजय दुबे, मुरलीधर धुर्वे, सुरेश गोनाडे, बंडू बारापात्रे, सुनील हेडाऊ, अविनाश भुरे, पराग झंझाड इत्यादी कंत्राटदार उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *