निरोगी आरोग्य व प्रदूषणमुक्त वातावरणसाठी छत्तीसगड राज्यातील माँ बम्लेश्वरीची सायकल वारी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : दिवसें-दिवस वातावरणात बदल होत असल्याने ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहे. याला मुख्य कारण म्हणजे विविध प्रभूषण आहे, या प्रभूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियातील काही युवक-युवतीने ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम वर्ष २०१७ पासून हातात घेतले आहे. प्रत्येक आठवड्याच्या रविवारला सकाळी १५ ते २० किलोमीटरने शहरात आणि शहराच्या आजूबाजूला सायकल चालवून प्रदूषण मुक्त व निरोगी आरोग्याचा संदेश देण्यात येत आहे. आता हाच संदेश छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातही पोहचावा या उद्देशाला घेऊन छत्तीसगड राज्यातील माँ बम्लेश्वरीचे धाम म्हणून प्रसिध्द डोंगरगड येथे मातृ पितृ दिवसाचे अवचित्त साधत मागील दोन वर्ष पासून गोंदिया ते डोंगरगड सायकल वारी करत असुन या तिसºया वर्षी सुद्धा १२ फेब्रुवारिला गोंदिया हुन ३० युवक-युवती सायकल ने गोंदिया ते डोंगरगड यात्रा करून माँ बम्लेश्वरीचे दर्शन घेण्यात येणार असुन या यात्रेत१३ वर्षापासून ते ८० वर्षा पर्यंत चे सायकलिस्ट सुद्धा सामील झाले आहेत. वर्ष २०१७ पासून शहरातील काही युवक युवतीने ‘संडे सायकलिंग’ ग्रुप तयार करत या ग्रुप च्या माध्यमातुन ‘एक दिन सायकल के नाम’ हे उपक्रम गोंदिया शहरात सुरु करण्यात आले. हे उपक्रम प्रत्येक रविवारला सकाळी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी आरोग्य व प्रदूषण मुक्तीसाठी संदेश देण्याचे कार्य करत आहेत. या अभियानातील दोन युवक अमन व शांती, निरोगी आरोग्य, प्रदूषण मुक्त भारत चा संदेश घेऊन तब्बल हजारो किलोमीटरची यात्रा करून बाघा बॉडर जम्मूकाश्मीर पर्यंत पोहचले. या अभियानाचा महत्व बघून अभियानाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत, निरोगी आरोग्य व प्रदूषण पासून दूर होण्यासाठी शेकडो युवकांनी सायकल चालविण्यास सुरवात केली आहे. आता हाच संदेश लगतच्या राज्यात छत्तीसगड येथे हि पोहचावा या उद्देशाला मागीलदोन वर्षा पासुन डोंगरगड येथील प्रसिध्द माँ बम्लेश्वरी चे दर्शन घेण्यासाठी व हा संदेश हजारो भक्तांच्या माध्यमातून पोहचावा म्हणून जात असुन यावर्षी सुद्धा गोंदिया तुन १२ फेबुवारी रविवारला ३० युवक-युवती सायकल यात्रा करत डोंगरगडला पोहचणार आहे. सायकल यात्रेला हिरवी झंडी गोंदिया शहरातील हिरवड टीम दाखवणार असुन आमगाव येथे या सायकल यात्रेचा स्वागत आमगाव तालुका पत्रकार संघ व खेतान मित्र परिवार करणार तर सालेकसा येथे सालेकसा पोलीस द्वारे सुद्धा स्वागत करण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत मंजू कटरे, रवी सपाटे, विजय येडे, साहिल खटवानी, दीपाली वाढई, प्रियंका रत्नाकर, भूमी खटवणी, उमेश माधवानी, अजित शेनमारे, कृष्णा शेंडे, निखिल बहेकर, अंजली उईके, योगेश ठाकरे, दीपक गाडेकर, जितेंद्र खरवडे, पलक कोठडिया, सरोज कापगते, हितेंद्र खरवडे, नरेंद्र बेलगे, आर्यन कुभलवार, अरुण बन्हाटे, अपर्णा शिन्हा (बिहार), बिट्टू कुमार (दिल्ली), प्रवीण बुरान, मनीषा बुरान, स्मिता भाटाचारिय, चंदन बघेल, पूजा तिवारी, अंकुश आगलावे, हीवराज लील्हरे हे या सायकल यात्रेत सामील सामील झाले असून सायकल यात्रेत जात आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *