‘त्या’ आरोपींनी काळ्या बिबट्याचीही केली शिकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : चिचगड वन व पोलिस विभागाने २६ फेब्रुवारी रोजी पालांदूर जमी व मंगेझरी येथे कारवाईत करीत वन्यप्राण्यांचे अवयव, रोख रक्कम जप्त केले होते. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज, १ मार्च रोजी याच प्रकरणातील चार आरोपींनी नवेगाव-नागझिरा व्याघ ्रप्रकल्पातील दुर्मिळ अशा काळा बिबट्याची शिकार केल्याची पुष्टी विभागीय वन अधिकारी प्रदिप पाटील यांनी केली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात काळ्या बिबट्याचे अस्तित्व असल्याची बाब जुलै २०२१ मध्ये समोर आली होती. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर ते प्रसिद्ध केल्यानंतर व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापनाने काळ्या बिबट्याच्या जोडप्याचे अस्तित्व मान्य केले होते. मात्र गेल्या पावनेदोन वर्षांपासूनव्याघ्रप्रकल्पात वावरणाºया काळ्या बिबटयाला व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाºयांना निसर्गाचे हे देणे सांभाळता आले नाही.
देवरी तालुक्यातील मंगेझरी व पालांदूर येथून प्रकरणातील आरोपी शामलाल ढिवरू मडावी, दिवारू कोल्हारे, मानिक दारसू ताराम, अशोक गोटे सर्व रा. मंगेझरी यांनी काळ्या बिबट्याचा बळी घेतल्याचे तपास करतांना उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्यात त्यांनी फास लावला. या फासात बिबट अडकला. त्यानंतर आरोपींनी भाल्याने वार करून त्याला ठार केले. १३ जानेवारीची ही घटना आहे. तत्पूर्वी १२ जानेवारीला कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र आढळले होते, हे विशेष. नागझिरा-नवेगाव व्याघ्रप्रकल्पाच्या संरक्षीत क्षेत्रात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आले आहेत. मृत काळा बिबट आपल्या सोबत्यासह ट्रॅप कॅमेºयात टिपला गेला होता. कॅमेºयात झालेल्या नोंदी डब्ल्यूआयआय व भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठविल्या जातात. भारतीय वन्यजीव संस्थेतील वैज्ञानिक बिलाल हबीब यांनी ट्विटर हँडलवर बिबट्याच्या जोडीचे छायाचित्र शेअर केल्यानंतर नवेगावनागझिरा व्याघ्रप्रकल्पात काळा बिबट असल्याचे समोर आले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *