कोंबड्यांची झुंज भोवली, तीन पोलिस कर्मचा-यांची बदली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात बंदी असलेल्या कोंबड्याच्या झुंजीला प्रोत्साहन देणे आणि झुंज लावणे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाºयांच्या चांगलेच अंगलट आले. तीन पोलिस कर्मचाºयांची तडकाफडकी मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी कोंबड्यांची झुंज लावत असतानाचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. तिन्ही पोलिस कर्मचाºयांची उपविभागीय पोलिस अधिकाºयांमार्फत चौकशी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, कारवाई करायला गेलेल्या लाखांदूर पोलिसांना कोंबड्यांची झुंज बघण्याच्या मोह झाला. पण हा मोह त्यांना चांगलाच महागात पडला आहे. झुंज बघण्याच्या व्हिडिओ काल मोठया प्रमाणात वायरल झाल्यावर माध्यमांनी त्याची दखल घेत वृत्त प्रकाशित केले होते. भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी त्याची दखल घेतली. बदली करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाºयांमध्ये लाखांदूर बीट जमादार वकेकर, बीट जमादार भोयर व एएसआय नैताम यांच्या समावेश आहे. याप्रकरणाची चौकशी पोलिस उपविभागीय अधिकाºयांमार्फत सुरू झाली आहे. साकोली उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे पोलिस अधीक्षक मतानी यांनी सांगितले. त्यांच्या चौकशीत काय निष्पन्न होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एक पोलिस कर्मचारी स्वत: कोंबड्यांची झुंज लावताना दिसत आहे. तर इतर ३ पोलिस कर्मचारी ही कोंबड्यांची झुंज पाहण्यात दंग झालेले दिसतात. काल हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भंडारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पण अवैध व्यावसायिकांचे कर्दनकाळ ठरलेले जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी या पोलिस कर्मचाºयांवर तातडीने बदलीची कारवाई केली आहे. कोंबड्यांच्या झुंजी लावणे आणि त्यावर जुगार खेळणे, या प्रकाराला महाराष्ट्रात कायद्याने बंदी आहे. कुठे असा प्रकार आढळला तर पोलिस कारवाई करतात. पण येथे तर पोलिसच कोंबडा बाजार भरवताना आणि स्वत: कोंबड्यांची झुंज लावताना जिल्हावासीयांनी पाहिले. त्यामुळे वरिष्ठांच्या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *