महाराष्ट्राला नियमित व स्वस्त दरात वीज पुरवठा देण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : २९२० मेगावाट स्थापित क्षमता असलेले चंद्रपूर महा औष्णिक विदयुत निर्मिती केंद्राचा वीज निर्मिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीचा नावलौकिक आहे. महाराष्ट्राला नियमित आणि स्वस्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मोठे योगदान आहे. कामगिरी व कार्यक्षमता सातत्याने उत्कृष्ट ठेवण्यासाठी चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राने पॅट सायकल -२ मधे वाढीव यश मिळविले आहे. पॅट (ढअळ) ही नॅशनल मिशन फॉर Enhanced
Energy Efficiency (NMEEE) युनिट उष्णता दर २५९८.१ किलोकॅलरी/केडब्ल्यूएच साध्य केले व लक्षित नेट युनिट उष्णता दरात १३९.४९ किलोकॅलरी/केडब्ल्यूएच ने कमी करण्यात यश संपादन केले. सदर यशामुळे पर्यावरणाचा ºहास/हानी कमी होण्यास हातभार लागला आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राकडे सकारात्मक एरउी १३२ ची संख्या १८८८९५ आहे, अंदाजे त्याची किंमत ३४.७६ कोटी रुपये आहे. देशात एकूण सर्व नियुक्त ग्राहकांना designated
consumers) मिळालेल्या ESCe१३२ पैकी १० टक्के वाटा हा निव्वळ चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा आहे. Bureau of Energy Efficiency च्या स्थापना दिनी म्हणजेच १ मार्च रोजी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ढअळ-२ अंतर्गत १५४ राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्रामध्ये देशातील सर्वाधिक एरउी१३२ मिळवत चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रथम असल्यामुळे सदर कार्यक्रमात चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्राचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आर. के. सिंग, अंतर्गत बाजारपेठेवर आधारीत यंत्रणा आहे ज्यात व्यापार करता येणाºया ऊर्जा बचतीच्या प्रमाणाद्वारे ऊर्जेची बचत अधिक खर्च प्रभावी बनवते. पर्यावरणपूरक जीवन ही संकल्पना आयोजनामागची आहे. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने विविध ऊर्जा संवर्धनाच्या प्रयोगानंतर नेट मंत्री (ऊर्जा, नवीन व नविकरणीय ऊर्जा)भारत सरकार यांचे हस्ते चंद्रपूर वीज केंद्राला सन्मानित करण्यात आले. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांनी हा सन्मान नवी दिल्ली येथे स्वीकारला.
याप्रसंगी भारत सरकारचे आलोक कुमार, सचिव, ऊर्जा मंत्रालय, आशिष उपाध्याय, अतिरिक्त सचिव ऊर्जा मंत्रालय, अजय तिवारी, इएए चे महासंचालक अभय भाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन, संचालक (संचलन) संजय मारुडकर यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले तसेच चंद्रपूर वीज केंद्रात कार्यरत अधिकारी,अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांचे कामाप्रति असलेले समर्पण आणि उत्स्फूर्त सहभागाचा हा परिपाक असल्याचे कार्यकारी संचालक पंकज सपाटे यांनी सांगितले. त्यांनी चंद्रपूर वीज केंद्राच्या संबंधित सवार्चे विशेष अभिनंदन केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *