अंगणवाडी कर्मचाºयांना पोषण ट्रॅकर साठी त्रास देणाºया अधिकाºयाविरुद्ध चोप दो आंदोलन – दिलीप उटाणे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन भंडारा जिल्हा नूतन कार्यकारणी ची पहिली सभा २ जुलै २०२३ रविवार रोजी राणा भवन भंडारा येथे कॉम्रेड सविता लुटे यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य कार्याध्यक्ष कॉ. दिलीप उटाणे व जिल्हा कार्याध्यक्ष कॉम्रेड हिवराज उके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. नुकत्याच समृद्धी महामार्गावर झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत स्थानिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली त्यात ोषण ट्रॅकर भरण्यासाठी एका प्रकल्पातून दुसºया प्रकल्पात काही पर्यवेक्षिका जाऊन अंगणवाडी कर्मचाºयांना शिवीगाळ करतात लाज शरम काढतात धमकवतात ही बाब अत्यंत निंदनीय आहे. कारण पोषण ट्रॅकर बाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले असून सुद्धा या प्रकारे अंगणवाडी कर्मचाºयांना त्रास देणाºया अधिकाºयाविरुद्ध चोप दो आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा राज्य कार्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे यांनी दिलेला आहे. माननीय उच्च न्यायालय यांनी अंगणवाडी केंद्रातील संपूर्ण माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकर एप्स इंग्रजी देण्यात आलेला आहे.

तो तो संपूर्ण मराठीत द्यावा तसेच चांगल्या प्रतीच्या दर्जेदार मोबाईल उपलब्ध करून देण्यात यावा अशा स्पष्ट सूचना उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेले आहे त्यांनी पुढे आदेशात असे नमूद केले आहे पोषण ट्रॅकर इंग्रजीत भरण्यासाठी कोणावरही दडपण आणता येणार नाही तसेच पत्र देता येणार नाही मानधन कपात करता येणार नाही असे आदेश देऊन भंडारा जिल्ह्यातील काही पर्यवेक्षिका दुसºया प्रकल्पात जाऊन पोषण ट्रॅकर भरण्यासाठी अंगणवाडी कर्मचाºयांना धमकवत आहेत त्रास देत आहेत ही बाब निंदनीय आहे हे थांबले नाही तर अंगणवाडी कर्मचारी चोप दो आंदोलन करतील या झोप परिणाम घडेल त्याला सर्वस्वी जबाबदार जिल्हा प्रशासन राहील. दरमहा पेन्शन, नवीन मोबाईल व प्रलंबित प्रश्नासाठी लढास तयार राहा असेही आवाहन दिलीप उटाणे यांनी केले. आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे १० वे जिल्हा अधिवेशन नुकतेच पार पडले. त्यात ११६ सदस्यांची जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली होती. पुढील तीन वर्षासाठी जिल्हा परिषदेची निवड खालील प्रमाणे करण्यात आली.

अध्यक्ष- सविता लुटे लाखनी, कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके, उपाध्यक्षमंगला गजभिये,भंडारा, रीता लोखंडे,तुमसर, मंगला रंगारी, लाखांदूर, अलका बोरकर, मोहाडी, रेखा टेंभुर्णी, साकोली, गौतमी मडपे,पवनी, सचिवदिलीप उटाणे,मोहाडी, सहसचिव- सुनंदा बडवाईक,तुमसर, मनीषा गणवीर, वंदना बघीले, मंगला गभने, प्रमिला बागडे, मंदा गोमासे, कोषाध्यक्ष- छाया क्षीरसागर, सह कोषाध्यक्ष- कुंदा भदाडे, संघटन सचिवसुनंदा चौधरी, वंदना पशिने, अनिता घोडीचोरे, छाया गजभिये, विजया काळे, गौतमी धवसे, संघटक- सुनंदा हेडावू, सहसंघटक- शालू कापसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके यांनी नुकतीच मंत्रालयात माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा व माननीय प्रधान सचिव अनुप कुमार यादव यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा वृत्तांत सांगितला बैठकीला राज्य कार्याध्यक्ष दिलीपभाऊ उटाणे उपस्थित होते. तसेच नियमितपणे एकत्रित मानधन देणे, वाढीव मानधन त्वरित सुरू करणे, थकित सेवासमाप्ती लाभ अदा करणे, मानधनाच्या निम्मी मासिक पेन्शन, ग्रॅच्युइटी लागू करणे, नवीन मोबाईल, थकित भाडे, इंधन भत्ता, प्रवास भत्ता, रिचार्ज, परिवर्तन निधी त्वरित अदा करणे, मागील उन्हाळी सुट्टी, भाडे वाढ, साहित्य अंगणवाडीत पोहोच करणे, छापिल रजिस्टर देणे, मिनी अंगणवाडीचे रुपांतर मोठ्या अंगणवाडीत करणे, सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात होणाºया वाढीची थकित रक्कम देणे, दुर्गम भागाचा भत्ता पुन्हा लागू करणे आदी विषयावर मार्गदर्शन केले. जिल्हा उपाध्यक्ष मंगला गजभिये यांनी सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *