पर्समधील दागिने चोरले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : येथील बसस्थानकावरून गावी जाण्याकरिता बसमध्ये चढत असलेल्या महिलेच्या पर्समधील अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केल्याची घटना घडली. महिला ही करडी येथे आपल्या गावाला जाण्याकरिता भंडारा बसस्थानकावरून बसमध्ये चढतांना अज्ञात चोरट्याने पर्समधील सोन्याचा मंगळसूत्र, सोन्याचा तिन अंगठया, दोन काळी पोत, सोन्याचे मनी व दोन लॉकेट, असा एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल असलेली लहान पर्स चोरून नेली. महिलेच्या तक्रारीवरून भंडारा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.