धर्मापुरी घाटातील रस्त्यावर पाडली नाली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील धर्मापुरी या गावांतून चूलबंध नदीच्या माध्यमातून गौण खनिजाचे स्वरूपात लाखोचे महसूल शासनाला प्राप्त होत असते, त्यामुळे गावातील विकासालाही चालना मिळत असते, मात्र शासन स्तरावरून काही वर्षांपासून घाटाचे लिलावच होत नसल्याने अवैध उत्खननाचे प्रमाणात वाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. अवैध उत्खननावर आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी नदिपात्रातील मार्गावर जेशीबी ने चक्कं नाली पाडून तस्करीचा डाव हानून पाडण्याची नवी क्लुप्ती लढवली मात्र केव्हापर्यत तस्करी वर पायबंद घालणार हेही मोठे आवाहन महसूल विभागापूढे उभा ठाकला आहे.

काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांचेकडे रेती तस्करी होत असल्याच्या संशयावरून गावांतील सरपंच यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती महसूल विभागाकडून मिळाली याच तक्रारीचा आधार घेत नायब तहसीलदार पाथोडे, मंडळ अधिकारी तलाठी मदनकर, बिसेन यांनी चक्क जेशीबी मशिन सोबत घेऊन रेती उत्खनन होणाºया मार्गावर नाली पाडून तस्कराचे मुसक्याच आवरल्याची ओरड गावात सूरु असतांनाच गावातील तसेच गावातील सूरू असलेले घरकुल बांधकाम कसे होणार हा एक मनस्ताप समोर ठेऊन गरीब,गरजू ओरडत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *