पालोरा, कोका गावठाण फिटर अंधारात

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा ः-विद्युत विजवितरण शाखा करडी अंतर्गत येत असलेल्या पालोरा कोका फिडरची दररोज दिड ते दोन तास लोडशेडींग करण्यात येत आहे.. विद्युत पुरवठा बंद होत असल्याने नागरीकांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या करडी गावठाण फिडरमध्ये लोडशेडींग केली जात नाही. मात्र पालोरा, कोका फिडरचा विज पुरवठा दररोज बंद केला जात आहे. केसलवाडा, कोका, जांभोरा, किसनपुर, लेंडेझरी, बोंडे, सर्पेवाडा, इंजेवाडा, दुधारा, चंद्रपूर इत्यादी गावे जंगला लगत असल्याने जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात गावात येत असतात. यामध्ये हिंस्र प्राणी आहेत.त्यांच्यामुळे पाळीव प्राणी व मनुष्यांना धोका असतो. रात्री लोडशेडींग होत राहिली तर अंधाराचा फायदा घेऊन वन्यप्राणी केव्हाही हल्ला करू शकतो. हा प्रकार रोजचाच सुुरू असून अनेक जनावरे वन्य पशूंनी मारले आहेत. त्यामुळे घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे. करडी येथील विद्युत विभागाचे शाखा अभियंता यांना कित्येकदा याबाबत बोलले असता त्यांचेकडून सांगितले जाते की, वरून लोडशेडींग आली आहे. वरीष्ठ अधिकारी यांना विचारले असता त्यांचेकडून सांगितले जाते की, लोडशेडींग नाही आहे. मग करडी येथील शाखा अभियंता चुकीची माहिती देत आहेत का? हा प्रश्न निर्माण होत आहे.

वरीष्ठ अधिकारी लोडशेडींग नाही म्हणतात. मग पालोरा, कोका परिसरात लोडशेडींग का केली जाते? त्यामुळे अठरा ते वीस गावाचा वाली कोणी नसल्यामुळेमोहाडी तालुक्यातील पालोरा आणि कोका गावठाणची लोडशेडींग केली जात आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय ? अशा प्रश्न निर्माण झाला आहे. तांत्रिक कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचा आदेश असतांना बाहेरगावी राहत असल्याने रात्री च्या वेळी एखाद्या वेळी लाईट गेली तर रात्रभर नागरीकांना अंधारात राहावे लागतो. त्यावेळी कोणीही अधिकारी कर्मचारी फोन उचलायला तयार राहत नाही. असे प्रकार असतांना शाखा अभियंता कडून दुर्लक्ष केले जातो. आणि एखाद्या नागरीकांनी वेळेवर बिल भरले नाहीतर लगेच विज कापली जातो. असा प्रकार अभियंता कडून होत असतांना एकही प्रतिनिधी बोलायला तयार नाही. मतदान मागण्यांसाठी सर्वच पक्षातील लोक येतात. मतदान झाला की पाच वर्षे दिसत नाही, अशी परिस्थिती या परिसरात दिसत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.