गर्रा येथे बाबासाहेबांची जयंती साजरी

वार्ताहर गोबरवाही : जि.प. पुर्व माध्यमिक शाळा गर्रा बघेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. लेझीम, भाषण, एकांकिका नाटक, रॅली याप्रकारची कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डॉ. भिमराव आंबेडकरांची वेषभुशा अंशुल चौधरी, म.जोतिबा फुले श्रेयस बांगरे, सावित्रीबाई फुले वंशिका ठाकुर, रमाबाई आंबेडकर दर्शना चापडायकेयांनी साकार केले. तसेच २०२१-२०२२ च्या वर्ग ५ वी च्या शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहार गर्रा बघेडा कडून मेडल व रमाबाई थोरपुरूष ग्रंथ यांची पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रावणी गाते यांनी केले. आभार मुस्कान गौरकर हिने मानले. शिष्यवृत्ती मध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनन्या बांगरे, आरुषी ठाकुर, नव्या समरित, विशाखा भुसारी, श्रेयस बांगरे, गोपाल चौधरी, प्रणित ठाकुर, विरू चावके आदी शिष्यवृत्ती धारक झालेली विद्यार्थीनी असून वंशिका ठाकुर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन बि. टी. पटले याचे लाभलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांना सहयोग शाळेचे मुख्यध्यापक टि.एन पटले, शिक्षकगण वाय.टी. घरसेले, जे.के.मने, जि.के. चौधरी, एस.एन.चचाने, एम पी.बांगरे, शामसुंदर घडपायले, विभाताई पटले यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *