चिखला खान येथे साजरा केला हिंदी पखवाडा दिवस

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : मॉयल लिमिटेड चिखला खान च्या वतीने प्रत्येक वर्षी हिंदी पखवाडा दिवस साजरा केला जातो. मॉयल इंडिया लिमिटेड चिखला खान मध्ये कार्यरत समस्त अधिकारी कर्मचारी आणि कामगार यांना मुख्यालयाच्या काटेकोर आदेशानुसार चिखला खान मधे हिंदी पखवाडा दिवस साजरा करण्यात यावा या करिता पत्र पाठवला जातो. हिंदी पखवाडा दिवस साजरा करण्या करिता चिखला खान मध्ये कार्यरत लेबर पोस्ट पासून ते मॅनेजर पोस्ट पर्यंत कार्यरत असलेले सर्व कर्मचाºयांना सहभाग होण्या करिता मुख्यालय तर्फे आदेश दिला जातो. हिंदी पखवाडा दिवस साजरा करण्यात येत असल्याच्या तारखेपासून ते १६ दिवस पर्यंत विविध प्रतियोगितेचा आयोजन केला जातो. या १६ दिवसाच्या कालावधीत प्रतियोगितेमधे प्रथम प्रतियोगिता म्हणून नोटिंग ड्राμिटंग प्रतियोगिता, द्वितीय प्रतियोगिता म्हणून पंचलाईन प्रतियोगिता, तृतीय प्रतियोगिता म्हणून शब्द ज्ञान प्रतियोगिता, चातुर्थ प्रतियोगिता म्हणून वाद विवाद प्रतियोगितेचा समावेश असतो. या विविध प्रतियोगितेत भाग घेण्याकरिता सर्व कर्मचारी बाध्य असतात.

प्रतियोगिता संपल्यावर प्रतियोगितेचा निकाल जवळपास बारा दिवसाच्या आत लागतो. शेवटी प्रतिस्पर्धा मध्ये ज्या कर्मचाºयांनी भाग घेतलेला आहे, त्या स्पर्धक कर्मचाºयां मधून विविध स्पर्धां मधे जिंकणाºया स्पर्धकाला मॉयल लिमिटेड चिखला खान येथे कार्यरत मान्यवर अधिकाºयांच्या हस्ते पारितोषिक दिले जाते. हिंदी पखवाडा दिवस प्रतियोगिताचा निकाल १० आॅक्टोंबर २०२२ ला लागला असून पंच लाईन प्रतियोगिता मधे रिता सुजय भुरे यांनी प्रतियोगिता जिंकली आहे. मॉयल लिमिटेड चिखला खान अंतर्गत आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी डॉ. राहुल क्षिरसागर यांच्या हस्ते पंच लाईन प्रतियोगिता विजेता श्रीमती रिता भुरे यांना पारितोषिक पुरस्कार देण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा मधे उपस्थित म्हणून मॉयल लिमिटेड चिखला खान चे कारमीक अधिकारी विवेक महाकाळकर, शिवनारायण गोप, निलेश ब्राह्मणकर, पुरुषोत्तम गजबे, इंदल गंगबोईर, प्रीतम चौधरी, एहफाज कुरैशी, अनिल भैसारे, पंकज गुप्ता, प्रीतेश नागदेवे, नवीन कयला, स्नेहा गजभिये, इंदु राणा कार्यक्रमात उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त कर्मचाºयांनी सर्वांचा आभार मानला असून पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने उत्तम रीतीने पार पडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *