अल्पवयीन कुमरिकेचा झाला विवाह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील पोलीस स्टेशन च्या हद्दीतील एका गावातील कुमारिका ही अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुद्धा कायद्याविरोधात जावून विवाह समारंभ पार पाडल्या प्रकरणी पती, आई वडील व सासू सासºयासह इतर नातेवाइकांवर बालविवाह प्रतिबंधक कायदा व पोस्को अन्वये लाखनी पोलीसानी गुन्हा दाखल केला आला आहे. पोलीस निरीक्ष्- ाक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन कुमरिकेचे सडक अर्जुनी तालुका जि. गोंदिया जिल्ह्यातील युवकासोबत फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह समारंभ पार पडला. विवाहाच्या वेळी वधूचे वय १७ वर्ष ३ महिने ५ दिवस असताना अल्पवयीन कुमारिकेचा विवाह समारंभ पार पाडण्यात आला.

ही बाब माहेर आणि सासर कडील मंडळींना माहित असतानाही विवाह समारंभ पार पाडला. कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी वय असल्याचे माहित असताना सुद्धा तिचे लग्न लावून देण्यात आले. त्यामुळे पिडीता ६ महिन्याची गर्भवती असल्याने पती, आई-वडिलांसह, सासू-सासरे इतर माहेरकडील व सासरकडील नातेवाईकांविरुद्ध नेपाल दशरथ गोटेफोडे यांच्याफिर्यादीवरून लाखनी पोलिसात अप. क्र. २१०/ २०२२ कलम ३७६(२) (एन) ३७६ (२)(जे) ३४ भा.द.वि. सह कलम ४,६, बाललैंगिक अत्याचार अधिनियम सन २०१२, तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम सन २००६ कलम ९,१०,११, नुसार देवानंद सुदाम इलमकर वय ४८ मीनाक्षी देवानंद इलमकर वय ४२ हितेश राजेश वासनिक वय २४ व त्याचे आई-वडील तसेच पीडितेच्या सासरकडील व माहेरकडील इतर नातेवाईक यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गौरी उईके घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *