रस्त्यावरील खड्डयाने घेतला दुचाकी पालकाचा बळी

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : आजकाल मित्रांचे सर्वत्र वाढदिवस साजरे करण्याचे फॅशनच झाली आहे. याकरिता शहरात दिवसेंदिवस केकचे दुकानसुद्धा गल्लोगल्ली लागत आहेत. असाच आप्तस्वीकीय वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बालाघाट येथे जात असलेल्या दुचाकी चालक हा रस्त्यावरील खड्डयामुळे खाली कोसळला आणि मागून येणाºया भरधाव ट्रकने दुचाकी चालकाला चिरडले. यात दुचाकी चालकाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. नागपुरातील परिवर्तन चौकातील ४५ वर्षीय विनोद जग्गु पटले असे मृतकाचे नाव आहे. सदर थरारक घटना सोमवार दि.१० एप्रिल २०२३ ला सकाळी ८ वाजे दरम्यान मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सिरसी गावालगत घडली. मोहाडी तालुक्यातील वरठी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अनेक अपघात होत असतात.
यातून अनेकांना जीव गमवावे लागते. सदर घटनेतही या खड्डयांनी आणखी बळी घेतला आहे. नातेवाईकाच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रम असल्याने विनोद पटले हे आपल्या दुचाकी क्रमांक क्र. एम.एच.४९/बी.जे.०८९३टि.व्ही.एस मोसा (लुना) या गाडीने दोन मुलांसोबत बालाघाटच्या दिशेने निघाले. त्यावेळी त्यांच्या मुलगा मोसम पटले (१६) व मुलगी साक्षी पटले (१४) हे सोबत होते. दुचाकी वरठी मार्गावरून सिरसी जवळून जात असताना रस्त्यावर पडलेल्या खड्डयामुळे विनोद पटले यांच्या दुचाकीवरून तोल सुटला. दुचाकीसमवेत मुले वडील रस्त्यावर कोसळले. याचवेळी मागवून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्र.एम.एच.३०ए.व्हि.-०४२० ने विनोद पटले यास चिरडले. ट्रकच्या मागील चाक हा विनोदच्या ट्रक पोटावरून गेल्याने विनोद यांचा पोटाखालील भाग पूर्णत: चेंदामेदाझाला. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला.
मात्र सुदैवाने दोन्ही मुले ही रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पडल्याने त्यांना कुठलीच गंभीर दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहायक फौजदारविजय सलामे, पोलीस हवालदार शैलेश आगाशे, नितीन भालधारे व वाहतूक विभागप्रमुख घनश्याम गोमासे यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी दोन मुले घाबरलेल्या अवस्थेत दिसली. मुलांना सौम्य दुखापत असल्याने त्याना प्राथमिक उपचार केंद्रात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. अपघातानंतर ट्रकचालक नरेश चंपतराव आंबेकर (४५) रा.शांतीनगर वर्धा याने वरठी पोलीस स्टेशनमध्ये आत्म समर्पण केले. विनोद पाटील हे घरचे प्रमुख कमावते असून काही दिवसाआधी त्याची पत्नीचाही मृत्यू झाले असल्याचे बोलले जात आहे. आधी आई नंतर वडील गेल्याने मुलांचा आधार संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यानंतर वरठी पोलिसांनी मुलांना बालाघाट येथे नातेवाईकाकडे नेऊन सोडले.
वरठी मार्गावर जीवघेणे खड्डे
वरठी-भंडारा मार्गाची अत्यंत दैयनिय अवस्था झाली आहे. आजपर्यंत या रस्त्याचे कधीच अपूर्ण बांधकाम झाले नाही. कधी अर्धा किलोमीटर तर कधी एक किलोमीटरच्या रस्ता तयार केला जातो. आता तर सदर रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसून येतात. वरठी येथून सनμलॅग कारखाना, अदानी कारखाना, वैनगंगा साखरकारखाना, रेल्वेस्टेशन, तहसील, महाविद्यालयव्यतिरिक्त मध्य प्रदेश व छत्तीसगडकडे मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस वाहनाची वर्दळ सुरू असते. रस्ता अत्यंत अरुंद असून फुटलेल्या दुरावस्थेत दिसून येतो. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. यात अनेकांनी जीव गमावला आहे.
सदर घटनेतही एका खड्डयामुळे मुलांच्या एकमेव आधार असलेल्या वडिलांच्या जीव गेला. याकडे बांधकाम विभाग व शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन रस्ताचे संपूर्ण काम करण्याची मागणी परिसरातील नागरीक करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *