प्रगती महिला कला महाविद्यालयात क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक प्रगती महिला कला महाविद्यालयात प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रा. दुर्गाप्रसाद चौधरी यांच्या अध्यक्षतेत क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी व समाजशास्त्र अभ्यास मंडळातर्फे करण्यात आले होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रा. दुर्गाप्रसाद चौधरी यांनी महात्मा फुले यांचे कार्य भारतातील समस्त महिलांकरिता प्रेरणादायी आहे. त्यांनी विपरीत सामाजिक व्यवस्थेशी लढून समस्त बहुजनांना शिक्षित केले आहे. त्यांच्या केलेल्या सामाजिक क्रांतीमुळेच आज लोक त्यांची जयंती साजरी करीत आहेत, असे सांगितले.
मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री सातोकर यांनी, फुले दाम्पत्यांनी बहुजनांना शिक्षित करण्यासाठी आयुष्यभर काया झिजवली, त्यामुळेच मानव जागृत होऊन स्वत:ची प्रगती करू लागला असे सांगितले. डॉ. जी. एन. कळंबे यांनी, महात्मा फुले हे उत्कृष्ट उद्योजकही होते. त्यांनी घाट, धरणेही बांधली. शेतकºयांच्या समस्या, स्त्री शिक्षण, शाळा उभारणे असे मोलाचे कार्य त्यांनी आपल्या कार्यकाळात केले, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. क्रिष्णा पासवान यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. शालिक राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्ञानेश्वर हिवसे, डॉ. पौर्णिमा वाहाणे, डॉ. ज्योत्सना गजभिये, प्रा. पुष्पा ठाकरे, प्रा. पलाश करकाडे, संजय वानखेडे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींची उपस्थितीत लक्षणीय होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *