पहेला येथे क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले जयंती साजरी

भंडारा पत्रिका/वार्ताहर पहेला : गांधी विद्यालय व कनिष्ठ महा. विद्यालय पहेला येथे क्रांतिसूर्य, थोर समाजसुधारक, म. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम विद्यालयाचे प्रभारी वाय.एन. काटेखाये यांच्या अध्यक्षतेत पार पडला. याप्रसंगी प्रा.एस. व्ही गोंडाणे, प्रा. व्ही . एल.हटवार, प्रा.एस. एस. भुरे, एच.बी. दहिवले, कु. सुरजकुवर मडावी, कु. पी. के. गिरड़कर, सौ. करुणा कावड़े, आणि विद्यालयातिल सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष वाय. एन. काटेखाये यांनी आपल्या मार्गदर्शनातून म. ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर व सामाजिक, शैक्षणिक कार्यावर मौलिक मार्गदर्शन केलेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. एच. भोयर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *