बाबा जमदव याच्या उपदशात समलनात सवाभाव, सदाचार बरच काही शिकवन जात – शभागी मढ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : संमेलनातून स्नेह वाढतो. जिथे अध्यात्म असते, तिथे स्नेहभाव निरंतर पाझरत असतो. बाबा जुमदेव यांच्या सेवकांच्या या संमेलनात सहभागी होऊन माझे हृदय भरून आले. सेवा आणि सदाचाराची शिकवण देणाºया या संमेलनातून घडणारे प्रत्येक कार्य ईश्वरीय आहे असे प्रतिपादन मोहाडी येथे परमात्मा एक सेवक संमेलनप्रसंगी शुभांगी मेंढे यांनी बोलतांना व्यक्त केले. ब.उ. परमपूज्य परमात्मा एक सेवकांच्या २६ व्या भव्य सेवक संमेलनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. आदरणीय लता दीदी आणि सर्व सेवकांच्या परिश्रमातून हे कार्य वृद्धिंगत होत आहे. समाज जीवनात प्रत्येक ठिकाणी मातृशक्ती आपला ठसा उमटविते. येथेही मातृशक्तीची उपस्थिती सहभाग नजरेत भरणारा आहे. आज समाज जीवनात वाईट वेसन दूर करण्यासाठी परमात्मा एक चांगले कार्य करीत आहे. अशा काळात आपल्याला व्यसनापासून दूर जायचे असेल तर समाज जीवनात एकच आत्मा तो म्हणजे परमात्मा एक आहे. धर्मांचे भाग असलेले मातृधर्म, पितृधर्म करीत असलेले कर्तव्य आणि मग तुमचा शेजारी पण धर्मच आहे. स्नेह हा धर्मच आहे आणि अशा सगळ्या धर्मांचे पालन करू तेव्हा हा समाज उभा राहील, म्हणून कर्म धर्मावर विश्वास ठेवा. आचरणात आत्म्याची ज्योती ही परमपूज्य असावी म्हणून परमात्मा असे नाव देऊन आपण या सगळ्या गोष्टी करतो.

सेवक संमेलनासाठी एकत्र आलेल्या सर्व सेवकांचे शुभांगी मेंढे यांनी यावेळी कौतुक केले. आराध्य भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने व महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाने ब.उ. प.पू. परमात्मा एक सेवक मंडळ मोह- ाडीच्या वतीने दु:खी गरीब व अज्ञानी मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करून देऊन सुखमय जीवनजगण्यास प्रेरीत करुन,वाईट व्यसन व अंधश्रद्धेपासून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या प्रेरणेने सामुहिक हवन कार्य मोहाडी मंडळातर्फे मंगळवार दि.३० जानेवारी २०२४ ला वर्षे २६ वे आयोजित करण्यात आले.सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत सामूहिक हवन कार्य उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली,सकाळी १० ते १२.३० वाजेपर्यंत परमात्मा एक भवनातून शोभायात्रा मोहाडी शहरात काढण्यात आली. दुपारी १२.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.सिरसोली येथील परमात्मा एक μलॉवर व सेंटर टेबलचे संचालक अभिलाष रामप्रसाद दमाहे, शुभम साठवणे,शैलेश बारई,प्रविण गाढवे यांनी उत्कृष्टरित्या हनुमान,बाबा जुमदेवजी, वाराणसी यांच्या छायाचित्राला सजवण्यात आले होते.

या छायाचित्रासमोर प्रमुख पाहुण्यांचे असते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे विधिवत उद्घघाटन करण्यात आले.दुपारी १.३० ते ६ वाजेपर्यंत मानव जागृती व अंधश्रद्धा निर्मूलन यावर परिसंवाद महानत्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीवर मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घघाटन उपाध्यक्ष नरेश सव्वालाखे,सचिव मोरेश्वर सार्वे,कोषाध्यक्ष कंठीराम पडारे,सहसचिव राजू पिलारे,संचालक नत्थू कोहाड,एकनाथ जिभकाटे,राजू माटे,गुरुदास शेंडे,रविकुमार मरसकोल्हे, सरस्वता माटे यांच्या उपस्थितीत आध्यात्मिक प्रमुख मानवधर्म प्रचार व प्रसारिका लता दिलीप बुरडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव ढबाले गुरुजी हे होते.

स्वागत गीत शिवानी दिलीप बुरडे तरनृत्यगीत आराध्य लांजेवार तुमसर हिने प्रस्तुत केले.पुढे बोलताना मेंढे यांनी माज्या थोड्याशा भाषेमध्ये काही चूक झाली तर तुम्ही सगळ्यांनी मला माफ करा. आम्ही पहिल्यांदाच या मेळावा मध्ये आली.आणि मला माझे असे विचार थोडेसेच मांडायला म्हणून खास कार्यक्रमाला फार उशीर झालाय.अध्यक्ष भाषणही झालाय त्यामुळे आपण काय सांगायचे हा प्रश्न पडला? पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्यांनी आपला पूर्ण ब्रम्हांड आणि ब्रम्हांडामध्ये सृष्टी निर्माण झाली आहे. पृथ्वी आणि आकाश खास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छिते. पृथ्वी म्हणजे सृष्टी आणि सृष्टीची निर्माता आपण मातृ शक्ती या मातृशक्तीला मी वंदन करते.आणि मातृशक्तीसाठी एकच सांगते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *