रेतीचा डेपो बनला रस्त्यांसाठी कर्दनकाळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : शासकीय किमतीत रेती उपलब्ध होण्यासाठी तालुक्यातील मोहरणा येथे सुरू करण्यात आलेल्या रेती डेपोने पावसाळ्यात नियमित शेकडो टिप्परने रेतीची वाहतूक केली जात असल्याने स्थानिक मोहरणा येथील रस्ते चिखलमय झाल्याने रेतीचा डेपो परिसरातील गावातील रस्त्यांसाठी कर्दनकाळ बनण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्राप्त माहितीनुसार, मागील ५ जून रोजी तालुक्यातील मोहरणा येथील वैनगंगा नदी घाटातून गट क्रमांक ८४८ च्या ४.१० हेक्टर पैकी ०.४० हेक्टर आर. क्षेत्रातील रेतीचा उपसा व डेपोमध्ये वाहतुकीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. तथापि या गटातून मागील ९ जून पर्यंत रेतीचा उपसा व डेपोमध्ये वाहतूक करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी निर्गमित केले होते. या निर्देशानुसार स्थानिक मोहरणा येथील वैनगंगा नदी घाटातून ९ जून पर्यंत ६२ हजार १० मेट्रिक टन रेतीचा उपसा करावयाचा होता.

तसेच ५ जून रोजी जिल्हाधिका-यांनी रेतीच्या डेपोला मंजुरी व ९ जून पर्यंत रेतीचा उपसा व डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे निर्देश निर्गमित करताच पुढील ३ दिवसांतच डेपोमध्ये हजारो ब्रॉस रेती जमा झाल्याने डेपो धारकांनी नियमबाह्य रेतीचा उपसा केल्याची संशय मागील ३-४ दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अवैधरित्या पोकलॅण्ड मशीनने रेतीचा उपसा व टिप्परने वाहतूक करताना स्थानिक मोहरणा येथील नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यामुळे डेपोमध्ये शासन निदेर्शाचे उल्लंघनात अवैधरित्या रेतीचा उपसा करून केवळ ३ दिवसातच डेपोमध्ये हजारो ब्रॉस रेती जमा केला असल्याचा आरोप नागरिकांमध्ये केला जात आहे. याप्रकरणी शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन भर पावसाळ्याच्या दिवसांत मोहरणा भागातील विविध रस्त्यांसाठी कर्दनकाळ बनणाºया रेतीच्या डेपोतून रेतीची वाहतूक थांबविण्याची मागणी गावकºयांतून केली जात आहे.

बॉक्स रेतीच्या वाहतुकीसाठी टिप्परांची गर्दी मोहरणा येथे रेतीचा शासकीय डेपो सुरू होताच या डेपोतून रेतीच्या वाहतुकीसाठी कित्येक टिपºयांची गर्दी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. भर पावसाच्या दिवसांत रॉयल्टी अंतर्गत डेपोतून रेतीची वाहतूक केली जात असल्याने स्थानिक मोहरणासह परिसरातील गावातील रस्त्यांवर खड्डे पडणे सुरू झाले असल्याचे देखील चर्चा आहे. तर भर पावसात टिप्परने रेतीची वाहतूक होत असल्याने स्थानिक मोहरणा गावातील रस्ते चिखलमय नागरिकांत व्यक्त केली जात आहे. झाल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *