दैतमांगली येथे पसरले घाणीचे साम्राज्य

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यातील मौजा दत्तमांगली येथे पावसाळ्याच्या पाण्यामुळे नाल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे गावांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लाखनी पंचायत समिती अंतर्गत येतअसलेल्या मौजा दैतमांगली ह्या गावामुळे पावसाच्या पाण्यामुळे नाल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. ग्रामपंचायतने मागील बरेच दिवसापासून गावातील नालीची साफसफाई केलेली नाही. गावकºयांनी गावातील काही लोकांना एकत्रित करून गावातील नाली साफसफाई साठी ग्रामपंचायत कडे अर्ज सादर केला. परंतु ग्रामपंचायत सचिवाने गावकºयांचे अर्जाला केराची टोपली दाखवून सामान्य फंडात पैसे नाही असे कारण पुढे करून गावकºयांना असभ्य वागणूक दिली. वास्तविकता सचिव व ग्रामपंचायत सदस्य गावातील स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यापूर्वीच गावातील नाल्या तसेच गटारांची साफसफाई करून साचलेल्या पाणी वाहते करणे आवश्यकअसते परंतु दैतमांगली येथील नागरिकांनी साफसफाई संबंधाने अर्ज करूनही साचले सचिवाने व कमेटीने परस्पर दुर्लक्ष करून एक प्रकारे गावात घाणीचे साम्राज्य निर्माण केलेले आहे.

गावातील नाल्यांमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी जाण्याची संभावना आहे. तसेच नाल्यांची साफसफाई न झाल्यामुळे नाल्यांमध्ये डासांची पैदास वाढून गावात साथीचे रोग पसरण्याची संभावना वाढू शकते. ग्रामपंचायतला वित्त आयोग तसेच टॅक्सच्या माध्यमातूनही ग्रामपंचायतला आवक येत असते परंतु, त्या निधीचा योग्य तरतूद करून खर्च करणे आवश्यक असते. परंतु संबंधित निधीच्या माध्यमातून स्वत:चा फायदा कसा होईल, हे ध्येय समोर ठेवून तो निधी खर्च केला जातो. जर गावातील लोकांच्या आरोग्याच्या विचार करून संबंधित निधी खर्च केला तर गावातील लोक निरोगी राहतील, गावातील नाल्या लवकरात लवकर साफ करण्यात यावी अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *