तुमसर बपेरा राज्य मार्गावर विश्रामगृह द्या

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर बपेरा राज्य मार्गावर असलेले इंग्रज कालीन विश्रामगृह हे नामशेष झाले आहेत. या राज्य मार्गावर नव्याने विश्रामगृह देण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हा सचिव गजानन निनावे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे. सिहोरा गावाला तुमसर तालुक्याची व्यापार नगरी व राजकारणाचा बालेकिल्ला असे म्हटले जात आहे. या बालेकिल्याला १० जिल्हा परिषद व २० पंचायत समित्या जोडल्या गेल्या आहेत. पैकी सिहोरा, बपेरा, चुल्हाड व येरली असे ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती क्षेत्र लागुन आहेत. परंतु या क्षेत्रात विश्राम गृह नाही ही शोकांतिका आहे. या क्षेत्रात इंग्रज कालीन का असेना चांदपूर हे विश्राम गृह म्हणून तर रनेरा येथील डाग बंगला हे निरीक्षण गृह म्हणून होते. आज ते नाहीसे झाले आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावर पत्रकारांसाठी ते अडचणीचे ठरत आहे.

तुमसर तालुक्यात लेंडेझरी व नाका डोंगरी येथे दोन विश्राम गृह आहेत. परंतु ते वनविभागाच्या अधिकार क्षेत्रात आहेत. खापा व देवाडी येथे असलेले दोन्ही विश्रामगृह हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार क्षेत्रात आहेत. तर चांदपुर येथील विश्रामगृह हा पर्यटन विकास महामंडळ यांचे अधिकार क्षेत्रात आहे. हे विश्रामगृह सर्वसामान्य जनतेच्या हिताचे नसल्यामुळे व तुमसर बपेरा राज्य मार्गावर असलेला रनेरा येथील डाग बंगला विश्राम गृह हा चारही जिल्हा परिषद क्षेत्राच्या मध्यभागी व उपयोगी असल्यामुळे सर्वांसाठी सोयीयुक्त ठरत आहे. हा जरी पडक्या अवस्थेत असला तरी याचे नव्याने बांधकाम करून निरीक्षण गृहा ऐवजी त्याचे विश्रामगृहात रूपांतर करावे. सर्व सोई सुविधेने सज्ज केल्यास हेच जनहितार्थ ठरेल. शासन, प्रशासन व जनप्रतिनिधींचे सुद्धा याकडे लक्ष वेधण्यात येत असल्याचेही भाजपाचे जिल्हा सचिव गजानन निनावे यांनी आपल्या मागणीतुन केले आहे.

विश्राम गृहाची गरज आहे. सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शासकीय, निमशासकीय तशेच प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांचे फिरते पथक किंवा बैठकीचे आयोजन केल्यास तथा पत्रकार परिषद घेण्याची गरज भासल्यास या क्षेत्रात कुठेही विश्रामगृह नाही. सध्या चांदपूरला जे विश्रामगृह आहे ते उद्घघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आणि ते पर्यटकांसाठी राखीव आहे. शासकीय व प्रशासकीय अधिकारी किंवा पदाधिकारी तशेच

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.