आर्टस कॉलेज, सिहोरा येथे विविध उपक्रमांचे आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी सिहोरा : स्थानिक आर्टस कॉलेज, सिहोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने “मेरी माटी, मेरा देश” या उपक्रमाअंतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली. त्याबरोबर वरील कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन चापले, संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव सोमनाथे गोंदेखारी येथील पालक मधुकर पटले प्रामुख्याने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सचिन चापले यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. त्याबरोबर दिलीपराव सोमनाथे व मधुकर पटले यांनी सुध्दा महाविद्यालयाच्या परीसरात वृक्षलागवड केली. “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमाअंतर्गत डॉ. जयकुमार क्षीरसागर यांनी प्रतिज्ञा वाचून विद्यार्थी व महाविद्यालयीन कर्मचारी यांच्या मुखातुन वदवून घेतले व वरील प्रतिज्ञेचे महत्व प्राचार्य महोदय यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले त्याचबरोबर महाविद्यालयात क्रांतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतीदिनाचे महत्व सोमनाथे यांनी पटवून दिले व क्रांतीवीरांच्या कार्यावर उजाळा टाकला. त्याबरोबर वृक्षारोपणाचे महत्व कार्यक्रम अधिकारी रा.से.यो. डॉ. प्रेमा कुंभलकर यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. वृक्षारोपणामध्ये आंबा, पिंपळ, करजी, वड, इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रेमा कुंभलकर कार्यक्रम अधिकारी रा.से.यो. यांनी केले तर आभार डॉ. चंद्रशेखर भेजे सांस्कृतिक विभाग प्रमुख यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *