अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल, साकोली येथे अंलकरण सोहळा यशस्वीरीत्या साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : स्थानिक अकॅडमिक हाईट्स पब्लिक स्कूल (एकोडी रोड) साकोली येथे दि. ९ आॅगष्ट २०२३ बुधवारला अंलकरण सोहळ्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.सी.जे. खुणे प्राचार्य एम.बी.पटेल कॉलेज साकोली तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक डॉ.राजेश चंदवानी, सचिव डॉ. गिता चंदवानी शाळा व्यवस्थापक जी. एच. ठाकरे, मुख्याध्यापिका स्मिता घोरमोडे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता पूजनीय शारदा मातेच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी देवून मोटीवेटर, अचिवर, प्रोग्रेसर, इनोवेटर अशाप्रकारे प्रमुख पद बहाल करून त्यांची कार्यप्रणाली सांगण्यात आली.

शाळेचे संचालक डॉ.राजेश चंदवानी ह्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी धैर्य आणि चिकाटी ने आपल्या कार्याचे प्रतिनिधित्व करावे अशाप्रकारे मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.जे.खुणे प्राचार्य एम.बी.पटेल कॉलेज साकोली ह्यानी विद्याथ्यार्ना शाळेतील शिस्त, आदरभाव आणि आदर्श विद्याथ्यार्चे गुण सर्व विद्याथ्यार्नी अंगीकारले पाहिजेत. असे आपल्या वक्तव्यात म्हटले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केतन हत्तीमारे, धामेद्र वलथरे, धनराज मेश्राम, सचिन मारवाडे, निखिल निबेंकर, कमलेश वासनिक, मोहन रहीमतकर, विद्यासागर तिरपुडे, स्नेहदिप सहारे, सा- रीका ठाकरे, नंदा कापगते, मृणाली कोसे, वैशाली मारवाडे, श्रुणाली जंवजाळ, शिरीन शेख, लता कटरे, शिवाली गुप्ता, दिक्षा गेडाम, विजया पडोळे, पुनम वाडीभस्मे, रेश्मा ढोमने, पुष्पलता आसलवार, प्रिती धुर्वे ह्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. हिमानी भेंडारकर, कु.सानवी लिंगलवार, कविश लोहिया ह्यांनी केले. तर आभार प्रदर्शन अतुल नंदेश्वर यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.