यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत प्राप्त १२.५६ कोटी तात्काळ वाटप करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतील लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत प्राप्त १२.५६ कोटी तात्काळ वाटप करा अशी मागणी एकलव्य सेना व वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी व गटविकास अधिकाºयांना निवेदनातून करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही भटक्या विमुक्त समाजातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढावा म्हणून त्यांच्या निवाºयासाठी महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात असलेली घरकुल योजना आहे. जी रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना च्या धरतीवर राबविण्यात येते. तसा जीआर २०१८ पासूनचा आहे. परंतु भंडारा जिल्ह्यामध्ये २०१८ पासून एकही लाभार्थी नव्हता. परंतु ढीवर समाज संघटनेच्या पुढाकाराने अनेकदा आंदोलने, निवेदने देण्यात आले. त्यामुळे ३०२३ घरकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु मागील दीड वर्षापासून सदर लाभार्थ्यांसाठी निधीच उपलब्ध होत नव्हता. त्यासाठी म्हणून ढीवर समाज संघटनेच्या पुढाकाराने काही महिन्या अगोदर भव्य असा ढीवर समाजाच्या धडक मोर्चा हजारो ढीवर बंधू भगिनी यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला होता. ज्याची फलश्रुती म्हणून ८५६ घरासाठी १२ कोटी ५६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

येत्या महिन्याभरामध्ये सर्व भटके विमुक्त समाजाच्या घरकुल लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल असा आशावाद निर्माण झाले. ज्यामुळे भटक्या विमुक्त, नदी काठावर राहणाºया ढीवर समाजाच्या पूरग्रस्त भागामध्ये राहणाºया समाजाच्या लोकांना निवारा मिळेल अशी आशा होती. परंतु एक महिना होऊन निधी १२.५६ कोटी निधी येऊन सुद्धा अद्याप भटक्या विमुक्त समाजाच्या घरकुलांना निधी वाटप करण्यात आलेला नाही. पावसाळ्यामध्ये जर निधी वाटप करतील तर नदी काठावर राहणारी लोक यांनी घर कसे बांधायची हा प्रश्न निर्माण होईल. एकूण ८५६ लाभाथ्यार्पैकी भंडारा पंचायत समितीने ४०, साकोली पंचायत समितीने १२०, पवनी पंचायत समितीने ६० अशा लाभार्थ्यांना निधी वाटप केलेला आहे.

मात्र मोठ्या प्रमाणात निधी वाटप करणे बाकी आहे. लवकरात लवकर जर निधी वाटप केला तर मातीच्या कौलांच्या घराचे रूपांतर सिमेंट काँक्रीटच्या घरामध्ये होईल व भटक्या विमुक्त समाजामध्ये स्थैर्यता निर्माण होईल. याच मागणीसाठी जिल्हाधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती भंडारा यांना निवेदन देवून सदर निवेदनात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत प्राप्त १२.५६ कोटी तात्काळ वाटप करा अशी मागणी करण्यात आली असता त्यांनी लवकरात लवकर निधी वाटपासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. निवेदन देताना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशासकीय सदस्य सुरेश खंगार, करचखेडा उपसरपंच सुभाष उके, पंचायत समिती सदस्य संजय बोंद्रे, शालीक कागदे, आदिष बावनथडे, शंकर बावनथडे, संजीव भुरे, प्रवीण मडामे, वंचित चे जिल्हा महासचिव दिगंबर रामटेके उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *